Goa Corona Update
Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: मोठा दिलासा! आठ महिन्यानंतर गोव्यात शून्य कोरोना रूग्णांची नोंद

Pramod Yadav

Goa Corona Update: गोव्याला कोरोना विरूद्धच्या लढाईत यश मिळताना दिसत आहे. गोव्यात तब्बल आठ महिन्यानंतर एकही कोरोनाबाधित रूग्णाची नोंद झालेली नाही. आरोग्य विभागाने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी (दि. 04 डिसेंबर) 166 रूग्णांचे प्रयोगशाळा नमूने तपासण्यात आले. त्यापैकी एकही रूग्णांची चाचणी सकारात्मक आलेली नाही. तसेच, रविवारी दिवसभरात तीन कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला.

(Goa Record 0 covid-19 cases after eight months, active caseload 17)

गोवा आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात सध्याच्या घडीला 17 कोरोनाबाधित रूग्णांवर (Active Corona Cases In Goa) उपचार सुरू आहेत. राज्यात आजवर 2 लाख 59 हजार 036 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 55 हजार 006 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजवर 4,013 जणांचा  कोरोनामुळे  मृत्यू झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.44 टक्के एवढा झाला आहे.

"मागील अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाची साथ नियंत्रणात आहे. यासाठी आरोग्य खात्याच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. नव्या कोरोना बाधितांना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार अलगीकरण आणि घ्यावयाची काळजी याविषयीच्या सूचना दिल्या जात आहेत. नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच साथ नियंत्रणात आली आहे. मात्र, वातावरण बदलामुळे सर्दी, ताप, खोकला यासारखे अजार उद्धभवल्यास न घाबरता वैद्यकीय सल्ला घ्यावा." असे आवाहन आरोग्य खात्याचे कोरोना विभागप्रमुख डॉ. प्रशांत सुर्यवंशी यांनी 'गोमन्तक' सोबत बोलताना केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

Cape News : पिर्ल, केपेत बेकायदा चिरे खाणीवर धाड; खनिजकर्म खात्याची कारवाई

Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

Covaxin Side Effect: कोविशील्डनंतर Covaxin वादाच्या भोवऱ्यात; अनेक दुष्परिणाम जाणवत असल्याचे अभ्यासातून उघड

SCROLL FOR NEXT