Cleanest City India  Dainik Gomantak
गोवा

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Swachh Survekshan Awards 2024-25: गोव्याची राजधानी पणजी शहराला 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२४-२५' अंतर्गत ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळाला

Akshata Chhatre

Goa Cleanliness Award: गोव्याची राजधानी पणजी शहराला 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२४-२५' अंतर्गत ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळाला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्वच्छ भारत अभियानातील अथक प्रयत्नांचे फळ

हे केवळ एक पारितोषिक नाही, तर स्वच्छ भारत अभियानांतर्गत पणजीने केलेल्या अथक प्रयत्नांची आणि दूरगामी बदलांची ही पावती आहे. घरोघरी कचरा संकलन करण्यापासून ते कचरामुक्त शहर प्रमाणपत्र मिळवण्यापर्यंत आणि कचऱ्याच्या शास्त्रीय प्रक्रियेची खात्री करण्यापर्यंत, पणजीने शहरी स्वच्छतेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. हा गौरव सर्व गोवावासीयांसाठी अभिमानाचा क्षण ठरलाय.

नेतृत्व आणि सहकार्याचे कौतुक

या यशामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाची आणि समर्थनाची भूमिका महत्त्वाची ठरली. तसेच पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी शहरात कचरा वर्गीकरण काटेकोरपणे पाळण्यासाठी त्यांनी केलेल्या सक्रिय प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले.

या यशाचे श्रेय केवळ प्रशासनालाच नव्हे, तर गोवावासीयांना, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पथकांना आणि सर्व संबंधित घटकांना देण्यात आले आहे, ज्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही मोठी उपलब्धी साध्य झाली. 'विकसित भारत २०४७' च्या संकल्पनेशी सुसंगत असे एक शाश्वत आणि स्वच्छ गोवा घडवण्यासाठी आम्ही सर्वजण नव्या निर्धाराने पुढे जात आहोत, असे या निमित्ताने स्पष्ट करण्यात आले.

साखळीलाही मिळाला बहुमान

यासोबतच, साखळी शहरालाही 'प्रॉमिसिंग स्वच्छ शहर' असा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. साखळी शहराला मिळालेला प्रॉमिसिंग स्वच्छ शहर पुरस्कार केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा सन्मान म्हणजे तळागाळातील सक्रिय प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. घराघरांमध्ये जाऊन कचरा संकलन करणे, कचरा वर्गीकरणाला प्रोत्साहन देणे आणि साखळीला स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवणे यांसारख्या उपक्रमांमुळे हे यश शक्य झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: अर्शदीप सिंहनं टाकलं 13 चेंडूंचं षटक! टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावावर केला लाजिरवाणा रेकॉर्ड

Goa Politics: 'भाजपचं 13 वर्षांचं राजकारण म्हणजे भ्रष्टाचाराची गाथा!' गोव्यात दाखल होताच अरविंद केजरीवाल यांचा सावंत सरकारवर हल्लाबोल VIDEO

Goya Club Seal: परवानग्यांमध्ये घोळ, सुरक्षा नियमांची ऐशीतैशी, वागातोरमधील प्रसिद्ध 'गोया' क्लब सील; गोव्यातील नाईटलाइफला कडक संदेश

Crime News: एकाला फाशी, 9 जणांना जन्मठेप... हिंसाचार करुन हत्या करणाऱ्या नराधमांना कोर्टाचा दणका; काय आहे नेमकं प्रकरण?

VIDEO: भारतीय सागरी सीमेत घुसखोरीचा पाकिस्तानचा डाव उधळला, बोट जप्तीसह 11 खलाशी जेरबंद; तटरक्षक दलाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT