Ration Card Holder Dainik Gomantak
गोवा

Ration Card: ऐन दिवाळीत स्वस्त धान्याचा पुरवठा होणार नाही? सरकारच्या 'या' कृतीमुळे दुकानमालकांचा मोठा निर्णय

नोव्हेंबरचा कोटा उचलणार नाही : दुकानदार

गोमन्तक डिजिटल टीम

Ration Card: स्वस्त धान्य दुकानदारांना सरकारकडून एक कोटी रुपये येणे बाकी आहे. शिवाय सरकारने कार्डधारकांना मोफत धान्य दिले. मात्र, ते धान्य नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांतून आणताना वाहतूक व मजुरीचा खर्च दुकानमालकांना सोसावा लागला.

ही रक्कमही अदा केलेली नाही. जोपर्यंत ही रक्कम सरकार देत नाही, तोपर्यंत नोव्हेंबरचा कोटा उचलला जाणार नसल्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे ऐन दिवाळीत रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्याचा पुरवठा होणार नसल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अखिल गोवा रास्त धान्य दुकानमालक संघटनेची आज वार्षिक सभा मडगावात झाली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. रास्त धान्य दुकानदारांची थकबाकी देण्याचा प्रश्र्न विधानसभेत आमदार विजय सरदेसाई आणि वेन्झी व्हिएगस यांनी उपस्थित केला होता.

मात्र, आता सात महिने झाले तरी अजून ही रक्कम दिली नसल्याचे गांधी यांनी सांगितले. सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करताना धान्याचा कोटा रास्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचविण्याची मागणी या बैठकीत केली. तालुका स्तरावर दुकानमालकांची समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT