Cuncolim Industrial Estate Pollution: ...अन्यथा औद्योगिक वसाहतीची प्रवेशद्वारे बंद करू; स्थानिकांचा इशारा

प्रदूषण रोखा, अन्यथा गंभीर परिणामास सामोरे जा : कुंकळ्ळीवासीयांचा निर्वाणीचा इशारा!
Cuncolim Industrial Estate
Cuncolim Industrial EstateDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Cuncolim Industrial Estate कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील मासळी प्रक्रिया प्रकल्प व इतर कारखान्यांतून होणारे जीवघेणे प्रदूषण न रोखल्यास सरकारसह प्रदूषणकारी कारखानदारांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा निर्वाणीचा इशारा कुंकळ्ळीतील युवकांनी रविवारी प्रदूषणविरोधी सभेत दिला.

सरकार, राजकीय नेते, स्थानिक स्वराज्य संस्था, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ या सर्वांच्या निष्क्रियतेमुळे औद्योगिक वसाहतीमधील जीवघेण्या प्रदूषणकारी कारखान्यांमुळे स्थानिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.

या प्रदूषणावर त्वरित तोडगा काढला नाही तर औद्योगिक वसाहतीची प्रवेशद्वारे बंद करू, असा निर्वाणीचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला. या प्रदूषणाविरोधात आवाज उठविण्यासाठी स्थानिक युवकांनी खास सभेचे आयोजन केले होते. या सभेला शेकडो लोक उपस्थित होते.

यासंदर्भात पुढच्या रविवारी सभा घेऊन सरकारला निवेदन देण्याचा ठराव घेण्यात आला. सभेचे निमंत्रक शंतनू देसाई यांनी हा ठराव मांडला. यावेळी विजय प्रभू, कुंकळ्ळी गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष आशिष नोरोन्हा, कुंकळ्ळी ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष यतीन तळावलीकर, जीनो, अंकुश देसाई, कुमारी प्रभुगावकर आणि कबीर मोराईस यांनी विचार मांडले. नगरसेवक उदेश देसाई, रेमंड डिसोझा, जॉर्सन फर्नांडिस यांनी सभेला उपस्थिती लावली होती.

कृती करा, पत्रव्यवहार नको!

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणावर कारवाई करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविणार असल्याचे विधान करून स्थानिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. हे मंडळच निष्क्रिय बनल्याने जनतेला रस्त्यावर उतरावे लागले.

अशा स्थितीत प्रदूषण नियंत्रण मंडळावर काय कारवाई करणार, असा प्रश्न स्थानिकांनी व्यक्त केला. युरी आलेमाव यांनी प्रदूषण बंद करण्यासाठी आपण जनतेसोबत रस्त्यावर उतरणार असल्याचे विधान केले होते, ते विसरले का? असाही प्रश्न ही यावेळी करण्यात आला.

सरकारकडे तीन महत्त्वाच्या मागण्या

1. कुंकळ्ळी वसाहतीमधील प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री, मुख्यमंत्री, औद्योगिक विकास महामंडळ अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी स्थानिक लोकांना सोबत घेऊन एकत्रितपणे पाहणी करावी.

2. औद्योगिक विकास महामंडळाच्या बंद असलेल्या इमारतीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कायमस्वरूपी कार्यालय स्थापन करावे आणि औद्योगिक वसाहतीवर लक्ष ठेवण्यासाठी खास कार्यालय स्थापन करावे.

3. वसाहतीमध्ये मासळी प्रक्रिया केलेले सांडपाणी सोडल्याचा आरोप सिद्ध झाल्यामुळे ज्या प्रकल्पांना दंड ठोठावला होता, तो त्वरित वसूल करावा.

Cuncolim Industrial Estate
Goa Petrol-Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या ताजे भाव

नेत्यांच्या ‘घुमजाव’बद्दल नाराजी

विरोधी पक्षनेते तथा कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव हे या सभेला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी या सभेकडे पाठ फिरवल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली.

युरी आलेमाव यांनी केवळ सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांमध्ये गर्जना न करता प्रत्यक्ष मैदानात उतरावे, अशी भावना लोकांनी व्यक्त केली. या सभेकडे सगळ्याच प्रमुख राजकीय नेत्यांनी पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

Cuncolim Industrial Estate
Goa Dairy: माजी अधिकाऱ्याविरुद्ध लाचप्रकरणी आरोप निश्‍चितीचा आदेश

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Casino Ship Case
Kapileshwari Kavale Pond Fish Death
Ganeshotsav Noise pollution Goa
Goa Local Jobs In Industrial Estates
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com