Goa Rape Case Dainik Gomantak
गोवा

Goa Rape Case : पणजी अत्याचार प्रकरणामुळे बाणावलीच्या 'त्या' घटनेला उजाळा

मद्यधुंद अवस्थेत बसमध्ये झोपलेल्या एका युवतीवर बलात्कार करण्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे.

आदित्य जोशी

मद्यधुंद अवस्थेत बसमध्ये झोपलेल्या एका युवतीवर बलात्कार करण्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले असून मागच्या वर्षी बाणावली समुद्रकिनाऱ्यावर आपल्या मित्रांबरोबर आलेल्या दोन मुलींवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेला यामुळे उजाळा मिळाला आहे.

मागच्या वर्षी जून महिन्याच्या सुमारास ही घटना घडली होती. आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्रीच्या वेळी बाणावली किनाऱ्यावर आलेल्या दोन मुलींवर चार जणांनी बलात्कार केला होता. त्यात एका सरकारी नोकराचाही सामावेश होता. पोलिस असल्याची बतावणी करून हा अत्याचार करण्यात आला होता.

2018 साली अशाच प्रकारची घटना बेताळभाटी समुद्रकिनाऱ्यावर घडली होती. आपल्या प्रियकराबरोबर किनाऱ्यावर आलेल्या एका युवतीवर इंदोर येथील ईश्वर मकवाना आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांनी तिच्या प्रियकराच्या उपस्थितीत सामूहिक बलात्कार केला होता. या अत्याचाराचे चित्रीकरण करून नंतर त्या युवतीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.

सांस्कृतिक ऱ्हासाचे प्रतिबिंब : डॉ. रूपेश पाटकर

पणजीत विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराची ही घटना म्हणजे समाजाच्या सांस्कृतिक ऱ्हासाचे प्रतिबिंब असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डाॅ. रूपेश पाटकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, या घटनेचा दोन तऱ्हेने विचार करायला हवा. शक्यता आहे की, संशयिताने असे कृत्य पूर्वी केले असेल. पीडित मुलीला बदनामीची भीती दाखवून त्याने स्वतःची सुटका करून घेतली असावी. पीडितेच्या असाहाय्यतेचा आणि भीतीचा उपयोग करून यापूर्वी तो बचावला असावा, म्हणूनच त्याने हा गुन्हा पुन्हा करण्याचे धारिष्ट्य दाखवले असेल. त्यामुळे पीडिता आणि तिच्या नातेवाईकांनी गुन्हा नोंदवण्याचे धैर्य दाखविले, ही योग्य गोष्ट केली आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे, त्या चालकाला एखादी मुलगी किंवा स्त्री ही उपभोगाची वस्तू वाटते. हे तो लहानपणापासून शिकला असावा. या घटनेतून मुलींबाबत, स्त्रियांबाबत मुलांमध्ये बालपणापासूनच आदर राखण्याचे संस्कार रुजवण्याची गरज आहे, हे सिद्ध होते. तिसरा मुद्दा, प्रत्येकाने स्वतःची सुरक्षितता पाहिली पाहिजे. मद्यपान करून किंवा नशा करून स्वतःला संकटात झोकणे योग्य नव्हे. मुलांनी अथवा मुलींनीही पोरसवदा वयात व्यसनांना ठामपणे नकार देणे आवश्यक आहे, असेही पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT