Goa ranks fifth in unemployment!
Goa ranks fifth in unemployment! Dainik Gomantak
गोवा

बेरोजगारीत गोवा पाचव्या क्रमांकावर!

दैनिक गोमन्तक

पणजी: देशात बेरोजगारी हा चिंतेचा विषय दिवसेंदिवस गहन होत आहे. कोविड काळात अनेक उद्योगधंदे बंद झाल्याने त्याचा परिणाम देशातील रोजगारीवर झाला आहे. सेंटर फॉर मोनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) कंपनीने एप्रिल 2022 पर्यंत केलेल्या सर्व्हेमध्ये देशात बेरोजगारीचे प्रमाण 7.8 टक्के आहे. गोव्यात हे प्रमाण 15.5 टक्के असल्याने ते देशाच्या प्रमाणापेक्षा दुप्पटीने आहे व पाचव्या क्रमांकावर आहे.

‘सीएमआई’ ने देशभरात प्रतिमहिन्याला

गतवर्षीपेक्षा प्रमाण घटले: गेल्या जून 2021 मध्ये देशात बेरोजगारीचे प्रमाण 11.84 टक्के होते. त्यानंतर हळूहळू वरखाली होत ते आता एप्रिल 2022 मध्ये 7.8 टक्क्यांवर आले आहे. कोरोनामुळेही अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे बेरोजगारांचे प्रमाण वाढले होते.

केलेल्या सर्वेनुसार गेल्या एप्रिल 2022 पर्यंत देशातील शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण 9.2 टक्के आहे तर ग्रामीण भागात हे प्रमाण 7.2 टक्के आहे. सर्वात बेरोजगारी हरियाणा (34.5.५ टक्के) तर सर्वात कमी बेरोजगारी हिमाचल प्रदेश (02 टक्के) आहे. हरियाणापाठोपाठ बेरोजगारीमध्ये राजस्थान (28.8 टक्के), बिहार (21.1टक्के), जम्मू व काश्‍मीर (15.6टक्के) व त्यामागे गोवा (15.5) टक्के, त्रिपुरा (१४.६) तसेच झारखंड (14.2), दिल्ली (11.2टक्के), तेलंगणा(9.9टक्के), सिक्कीम (8.7टक्के) या दहाजणांचा क्रमांक लागतो.

गेल्यावर्षी देशात कोविडचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक उद्योग व धंदे बंद ठेवण्यात आले होते. त्यातील काहींना फटका बसल्याने ते पुन्हा सुरूच झाले नाहीत. गोव्यामधील स्थिती देशातील बेरोजगारीपेक्षा अधिक अवघड आहे. राज्याची लोकसंख्या सरासरी 15 लाख आहे. 15.5 टक्के प्रमाण पाहिल्यास राज्यात 1 लाख 55 हजार बेरोजगार सध्या आहेत. डीजिटलायझेशनमुळे नोकरीच्या संधीमध्ये घट झाली आहे. बँकांमध्ये तसेच खासगी उद्योगात कायम स्वरुपी नोकऱ्या मिळत नाही तर त्या पॅकेजवर असतात. त्यामुळे अनेकजण सरकारी नोकऱ्यांमागे धडपडत असतात. सरकारकडून या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन केले जाते. मात्र, त्यामध्ये अजून यश मिळालेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT