IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

IND vs AUS 2nd ODI: भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 7 विकेट्सने गमावला असल्यामुळे मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी टीम इंडियाला हा दुसरा सामना जिंकणे आवश्यक आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे (ODI) मालिकेतील दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा सामना उद्या, 23 ऑक्टोबर रोजी ॲडलेड येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 7 विकेट्सने गमावला असल्यामुळे मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी टीम इंडियाला हा दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला, पण दुसऱ्या सामन्यात हवामान साफ राहण्याची शक्यता आहे. चला तर मग या महत्त्वाच्या सामन्याचा थरार आपण टीव्हीवर आणि मोबाइलवर लाईव्ह कसा पाहू शकतो? याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

टीव्ही आणि मोबाइलवर लाईव्ह मॅच कशी पाहावी?

भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील सामन्यांचे स्ट्रीमिंग राइट्स (Broadcasting Rights) स्टार स्पोर्ट्स (Star Sports) या वाहिनीने विकत घेतले आहेत. जर तुम्हाला टीव्हीवर लाईव्ह सामना पाहायचा असेल तर तुम्ही थेट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर पाहू शकता. स्टार स्पोर्ट्सच्या हिंदी, इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील वाहिन्यांवर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाषेत सामना पाहू शकता.

याशिवाय, मोबाइलवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी तुम्ही Disney+ Hotstar ॲपचा वापर करु शकता. तुमच्या मोबाइलमध्ये हे ॲप असायला हवे आणि ते अपडेटेड आहे की नाही, हे तपासा. Streaming पाहण्यासाठी ॲपवर कोणतेही शुल्क (Subscription) आकारले जात नाही ना, याचीही एकदा खात्री करुन घ्या.

Team India
Ind vs Aus 2nd ODI: टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियात 'मैदान-ए-जंग', ॲडलेडमध्ये लकी रेकॉर्ड; 17 वर्षांपासून या मैदानावर भारताचा पराभव नाही!

फ्रीमध्ये सामना पाहण्याची संधी

तसेच, ज्या प्रेक्षकांना शुल्क न भरता म्हणजेच फ्रीमध्ये (Free) सामना पाहायचा आहे, त्यांच्यासाठीही एक सोपा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या टीव्हीवर डीडी फ्री डिश (DD Free Dish) वापरत असाल, तर तुम्ही दूरदर्शन स्पोर्ट्स (DD Sports) या वाहिनीवर हा सामना पूर्णपणे मोफत पाहू शकता. मात्र, यासाठी तुमच्याकडे डीडी फ्री डिश असणे गरजेचे आहे, हे लक्षात ठेवावे.

Team India
IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडेसाठी दोन्ही संघ:

भारतीय संघ (पूर्ण स्क्वॉड): रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल.

ऑस्ट्रेलियाई संघ (पूर्ण स्क्वॉड): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रेविस हेड, मॅथ्यू शॉर्ट, ॲलेक्स कॅरी, मॅट रेनशॉ, कूपर कोनोली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, जोश हेजलवुड, ॲडम झम्पा, बेन ड्वारशुइस, मार्नस लाबुशेन, झेवियर बार्टलेट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com