Ranji Cricket Dainik Gomantak
गोवा

Ranji Cricket: बंगळूरमध्ये रणजी क्रिकेट संघाचे शिबिर

Goa Ranji Trophy Camp: गोव्याच्या सीनियर पुरुष क्रिकेट संघाचे रणजी करंडक स्पर्धापूर्व शिबिर बंगळूरमध्ये होईल.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याच्या सीनियर पुरुष क्रिकेट संघाचे रणजी करंडक स्पर्धापूर्व शिबिर बंगळूरमध्ये होईल. ओमान दौऱ्यात ऐतिहासिक एकदिवसीय मालिका जिंकलेला संघ थेट कर्नाटकच्या राजधानीत दाखल झाला असून पंधरा सदस्यीय संघात आणखी १२ खेळाडूंना सामावून घेण्यात आल्याची माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) सचिव तुळशीदास शेट्ये यांनी दिली.

याशिवाय ललित यादव व अर्जुन तेंडुलकर हे ‘पाहुणे’ क्रिकेटपटूही बंगळूरमधील शिबिरात भाग घेणार आहे. ओमान दौऱ्यातील संघात फक्त वासुकी कौशिक हा एकमेव ‘पाहुणा’ क्रिकेटपटू होता. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील गोव्याची मोहीम ११ ऑक्टोबरपासून बडोद्याविरुद्ध घरच्या मैदानावरील लढतीने सुरू होईल.

गोव्याच्या एलिट ‘अ’ गटात जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, विदर्भ, बडोदा, उत्तर प्रदेश, पुदुचेरी, बिहार या संघांचा समावेश आहे. बंगळूरमधील सराव शिबिराच्या कालावधीत गोव्याचा संघ कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (केएससीए) स्पर्धेतही खेळणार आहे.

गतमोसमात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंपैकी यष्टिरक्षक समर दुभाषी, फलंदाज कश्यप बखले, डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकर यांची नावे यादीत नाहीत.

रणजी संघ शिबिरासाठी निवडलेले खेळाडू: स्नेहल कवठणकर, मंथन खुटकर, दर्शन मिसाळ, मोहित रेडकर, दीपराज गावकर, हेरंब परब, विकास सिंग, चिगुरुपती व्यंकट, अभिनव तेजराणा, यश कसवणकर, शिवेंद्र भुजबळ, सुयश प्रभुदेसाई, जीवनकुमार चित्तेम, वासुकी कौशिक, फेलिक्स आलेमाव, ईशान गडेकर, शुभम तारी, शुभम देसाई, राहुल मेहता, समीत आर्यन मिश्रा, शदाब खान, पियुष यादव, ऋत्विक नाईक, विजेश प्रभुदेसाई, राजशेखर हरिकांत, तुनीष सावकार, मनीष काकोडे, ललित यादव व अर्जुन तेंडुलकर, मुख्य प्रशिक्षक: दिनेश मोंगिया, गोलंदाजी प्रशिक्षक: जे. कृष्ण राव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT