Ranji Trophy Cricket Tournament Dainik Gomantak
गोवा

Ranji Trophy Cricket: द्विशतकी भागीदारीमुळे कर्नाटकचे गोव्यावर वर्चस्व

Ranji Trophy Cricket: मयांक अगरवाल, देवदत्त पडिक्कलचे शतक

किशोर पेटकर

Ranji Trophy Cricket : कर्णधार मयांक अगरवालचे सलग दुसऱ्या सामन्यातील शतक, तसेच त्याने आणखी एक शतकवीर देवदत्त पडिक्कल याच्यासमवेत केलेल्या द्विशतकी भागीदारीमुळे रणजी करंडक क्रिकेट सामन्यात कर्नाटकने शनिवारी दुसऱ्या दिवशी वर्चस्व राखले. म्हैसूर येथील श्रीकांतदत्त नरसिंह राजा वडियार मैदानावर सामना सुरू आहे.

अर्जुन तेंडुलकर व हेरंब परब या अनुक्रमे आठव्या व दहाव्या क्रमांकावरील फलंदाजांनी अर्धशतके नोंदवत नवव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. त्यामुळे पहिल्या दिवसअखेरच्या ८ बाद २२८ वरून गोव्याने शनिवारी सकाळी पहिल्या डावात ३२१ धावांची मजल मारली.

त्यास उत्तर देताना कर्नाटकने दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद २५३ धावा केल्या. ते अजून ६८ धावांनी मागे आहेत. दिवसातील अखेरची दहा षटके बाकी असताना कर्नाटकने दोघाही शतकवीरांसह तीन फलंदाज १३ धावांत गमावले त्यामुळे १ बाद २३८ वरून त्यांचा डाव घसरला.

अनुभवी फलंदाज मनीष पांडे जायबंदी आहे, तो फलंदाजीस उतरू शकला नाही, तर कर्नाटकला फटका बसू शकतो.

211 धावांची भागीदारी

उपाहारापूर्वीच्या अखेरच्या षटकात गोव्याचा कर्णधार डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ याने डी. निश्चल या पायचीत बाद केल्यानंतर मयांक व देवदत्त यांची जोडी जमली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी २११ धावांची भागीदारी केली.

शतकानंतर आक्रमक फटका मारण्याच्या नादात देवदत्तने फिरकी मोहित रेडकरच्या गोलंदाजीवर स्लिप क्षेत्रात दर्शनच्या हाती झेल दिला. या २३ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने चौथे प्रथम श्रेणी शतक नोंदविले.

त्याने १४३ चेंडूंत १०३ धावा करताना १३ चौकार लगावले. ३२ वर्षीय मयांकने ९७व्या प्रथम श्रेणी सामन्यात १७वे शतक पूर्ण केले.

अगोदरच्या लढतीत गुजरातविरुद्ध त्याने पहिल्या डावात १०९ धावा केल्या होत्या. मयांकने १७९ चेंडूंत ११४ धावा करताना १० चौकार मारले. पॉईंट क्षेत्रात दर्शनच्या गोलंदाजीवर ईशान गडेकरने त्याचा झेल टिपला.

अर्जुन, हेरंब यांचा प्रतिहल्ला

चंडीगडविरुद्ध पर्वरी येथे ७० धावांची खेळी केलेल्या डावखुऱ्या अर्जुन तेंडुलकरने सलग दुसऱ्या डावात अर्धशतक नोंदविताना हेरंब परब याच्यासमवेत कर्नाटकवर प्रतिहल्ला चढविला. त्यामुळे गोव्याला आव्हानात्मक त्रिशतकी मजल मारता आली.

अर्जुनने ११२ चेंडूंत तीन चौकार व एका षटकाराच्या मदतीने ५२ धावा केल्या. रणजी स्पर्धेत प्रथमच अर्धशतक केलेल्या हेरंबने ८१ चेंडूंत आक्रमक ५३ धावा करताना आठ चौकार व एक षटकार मारला. एम. व्यंकटेशने हेरंबला त्रिफळाचीत बाद करून धोकादायक भागीदारी फोडली.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव (८ बाद २२८ वरून): ११०.१ षटकांत सर्वबाद ३२१ (अर्जुन तेंडुलकर ५२, हेरंब परब ५३, फेलिक्स आलेमाव नाबाद ३, व्ही. कौशिक १-४९, व्ही. वैशाख ३-७६, एम. व्यंकटेश ३-४१, ए. सी. रोहित कुमार ३-९०).

कर्नाटक, पहिला डाव: ६४ षटकांत ४ बाद २५३ (डी. निश्चय १६, मयांक अगरवाल ११४, देवदत्त पडिक्कल १०३, निकिन जोस नाबाद ३, रोहित कुमार २, एस. शरथ नाबाद ०, अर्जुन तेंडुलकर ८-१-३६-०, हेरंब परब ५-०-२८-०, दर्शन मिसाळ २४-१-६८-२, मोहित रेडकर १८-२-६५-२, फेलिक्स आलेमाव ९-१-४५-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT