गोव्याचा १५ सदस्यीय रणजी करंडक क्रिकेट संघ. सोबत जीसीए सीनियर क्रिकेट संचालक प्रकाश मयेकर, प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ. Dainik Gomantak
गोवा

Goa Ranji Team: अमूल्य, समर, हेरंबचे रणजी संघात पुनरागमन; दर्शन मिसाळ कर्णधारपदी कायम

दीपराज गावकर उपकर्णधार, आगरतळा येथे त्रिपुराविरुद्ध पहिला सामना

किशोर पेटकर

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याची एलिट ‘क’ गटातील मोहीम त्रिपुराविरुद्धच्या लढतीने शुक्रवारपासून (ता. ५) सुरू होणार आहे. आगरतळा येथे खेळल्या जाणाऱ्या या चार दिवसीय सामन्यासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने सोमवारी १५ सदस्यीय संघ जाहीर केला.

अष्टपैलू दर्शन मिसाळ कर्णधारपदी कायम असून दीपराज गावकर याला उपकर्णधारपदी बढती मिळाली. डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकर, यष्टिरक्षक समर दुभाषी, वेगवान गोलंदाज हेरंब परब यांनी पुनरागमन केले.

गतमोसमातील पाच जणांची निवड नाही

गतमोसमात (२०२२-२३) मोसमात रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळलेल्या एकूण पाच जणांना त्रिपुराविरुद्धच्या सामन्यासाठी गोव्याच्या संघात स्थान मिळालेले नाही. यामध्ये अनुभवी फलंदाज अमोघ देसाई व सुमीरन आमोणकर, वेगवान गोलंदाज फेलिक्स आलेमाव व ऋत्विक नाईक, फिरकी गोलंदाज शुभम देसाई यांचा समावेश आहे.

संघात तिघे पाहुणे खेळाडू

गोव्याच्या रणजी करंडक संघात डावखुरा वेगवान अर्जुन तेंडुलकर याच्यासह महाराष्ट्राचा फलंदाज राहुल त्रिपाठी, कर्नाटकचा यष्टिरक्षक-फलंदाज के. व्ही. सिद्धार्थ असे तिघे पाहुणे क्रिकेटपटू आहेत.

त्रिपुराविरुद्धच्या सामन्यासाठी गोव्याचा संघ

ईशान गडेकर, मंथन खुटकर, सुयश प्रभुदेसाई, राहुल त्रिपाठी, के. व्ही. सिद्धार्थ, स्नेहल कवठणकर, दर्शन मिसाळ (कर्णधार), दीपराज गावकर (उपकर्णधार), मोहित रेडकर, समर दुभाषी, अर्जुन तेंडुलकर, विजेश प्रभुदेसाई, लक्षय गर्ग, हेरंब परब, अमूल्य पांड्रेकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले...तरुणीचा जीवघेणा स्टंट व्हायरल! पोलीस घेतायत शोध

Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT