Darshan, Mohit
Darshan, Mohit Dainik Gomantak
गोवा

Ranji Cricket: दर्शन, मोहितसह अर्जुनचाही प्रतिहल्ला

किशोर पेटकर

Ranji Cricket: प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यामुळे गोव्याची ६ बाद ७२ अशी घसरगुंडी उडाली. मात्र कर्णधार दर्शन मिसाळ, मोहित रेडकर यांच्यासह अर्जुन तेंडुलकर यांनी चढवलेल्या प्रतिहल्ल्यामुळे गुजरातविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गट सामन्यात यजमान संघाने शुक्रवारी पहिल्या दिवसअखेर ९ बाद ३०९ अशी सन्मानजनक मजल मारली.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर डावखुऱ्या दर्शनने (८९) तळाच्या अर्जुन (४५) व मोहित (८०) यांच्यासमवेत झुंजारपणे किल्ला लढविला, त्यामुळे गुजरातच्या गोलंदाजांनी संयमही गमावला.

गुजरातने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. खराब फलंदाजीमुळे गोव्याची उपाहारानंतर लगेच दाणादाण उडाली. प्रतिकुल परिस्थितीत दर्शन व अर्जुन यांनी सातव्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली.

त्यामुळे गोव्याला दीडशे धावांचा टप्पा ओलांडला आला. लेगस्पिनर रवी बिष्णोई याने त्रिफळाचीत बाद केल्यामुळे डावखुऱ्या अर्जुनचे मोसमातील तिसरे अर्धशतक पाच धावांनी हुकले. त्याने ७० चेंडूंचा सामना करताना आठ चौकार मारले.

अर्जुन वैयक्तिक पाच धावांवर, तर गोव्याची ६ बाद ८५ अशी स्थिती असताना अरझान नागवासवाला याच्या गोलंदाजीवर सनप्रीतसिंग बग्गा याने झेल सोडला, त्यामुळे नंतर गुजरातला नुकसान सहन करावे लागले.

दर्शन व मोहित यांनी आक्रमणावर भर देत गुजरातच्या गोलंदाजांची लय बिघडवून लागली. भारताच्या टी-२० संघाचा सदस्य रवी बिष्णोई फिका ठरला. मोहितने डावखुरा वेगवान नागवासवाला याला मारलेला जबरदस्त षटकार थेट जीसीए अकादमीच्या छप्परावर गेला.

गुजरातचा डावखुरा फिरकी गोलंदाज सिद्धार्थ देसाई याने लेगस्टंपच्या बाहेर टप्पा पकडल्यानंतर दर्शनची एकाग्रता भंगली. प्रियांक पांचाळ याने अचूक झेल पकडल्यामुळे गोव्याच्या कर्णधाराचे पाचवे रणजी शतक ११ धावांनी हुकले.

त्याने ११० चेंडूंत १२ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ८९ धावा करताना मोहितसह आठव्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली.

वैयक्तिक ८० धावांवर सिद्धार्थच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याचा मोहितचा प्रयत्न चुकला व सीमारेषेजवळ मनन हिंग्रजिया याने छान झेल पकडला. २३ वर्षीय फलंदाजाने ९१ चेंडूंतील खेळीत ८ चौकार व ४ उत्तुंग षटकार मारले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: ८३ षटकांत ९ बाद ३०९ (अमोघ देसाई ४, सुयश प्रभुदेसाई २८, मंथन खुटकर १९, के. व्ही. सिद्धार्थ १२, स्नेहल कवठणकर ३, दीपराज गावकर ४, दर्शन मिसाळ ८९, अर्जुन तेंडुलकर ४५, मोहित रेडकर ८०, लक्षय गर्ग नाबाद ५, हेरंब परब नाबाद ५, चिंतन गजा २-५६, प्रियजितसिंह जडेजा २-५८, अरझान नागवासवाला १-७४, सिद्धार्थ देसाई २-४७, रवी बिष्णोई १-५६).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

SCROLL FOR NEXT