डिचोली: रक्षाबंधनाचा सण एक दिवसावर येऊन ठेपल्याने लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठा सजल्या असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. शनिवारी साजरा होणाऱ्या या सणानिमित्त बाजारपेठा नानाविध आकर्षक राख्यांनी सजली आहे. भगिनी आपल्या भावांसाठी राख्या खरेदी करताना दिसून येत आहेत.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही राख्यांच्या खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. वाढलेले स्टॉल्स, त्यातच ऑनलाईन खरेदी आणि राख्यांचे प्रदर्शन यामुळे गेल्या-चार वर्षांपासून राख्यांच्या बाजारावर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राख्या खरेदीला अजूनतरी अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळालेला नाही.
रक्षाबंधन म्हणजेच बहीण-भावाच्या अतूट नात्याचे महत्त्व सांगणारा सण. शनिवारी (ता. ९) हा सण साजरा होणार आहे. रक्षाबंधनाला अवघेच क्षण राहिल्याने सर्वत्र उत्साह संचारला असून, डिचोलीचा बाजार आकर्षक राख्यांनी फुलला आहे. काही पारंपरिक दुकानांसह शहरातील बाजार संकुलातील जागेत थाटण्यात आलेले स्टॉल्सही राख्यांनी सजले आहेत.
लहान मुलांसाठी खास अशा विविध कलाकुसरीच्या आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्या राख्या लहान मुलांबरोबरच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. २० रुपयांपासून २०० ते ५०० रुपयांपर्यंत असा राख्यांचा दर आहे. मात्र चार-पाच वर्षांपूर्वी राख्यांची खरेदी जशी व्हायची तशी ती आता होताना दिसत नाही. त्यामुळे विक्रेतेही धास्तावले आहेत. त्यांनी सावध पावले उचलली आहेत.
पाच-सहा वर्षांपूर्वी रक्षाबंधनाला दोन-तीन दिवस असताना राख्यांची खरेदी जोरात व्हायची. विक्रेत्यांना फुरसत मिळत नव्हती. मात्र आता हळूहळू हा व्यवसाय संकटात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही राख्यांच्या विक्रीत काहीशी घट होणार आहे. ऑनलाईन खरेदी आणि राख्या विक्रेत्यांचा आकडा वाढल्याने खरेदीवर परिणाम झाला आहे. राखी विक्रीत यंदा २५ ते ३० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.