Goa: एक राखी सैनिकां’साठी कार्यक्रमात हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राख्या सुपूर्द करताना अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी. बाजूस प्रताप भेंडाळकर, मोहंती, प्रियवंदा सिंग परी, अनंत जोशी, श्रीधर देसाई व मान्यवर.  Dainik Gomantak
गोवा

Goa: सैनिकांना शत्रूशी लढण्यास बळ देते राखी ः आर्लेकर

Goa: ‘एक राखी सैनिकां’साठी कार्यक्रम

Yeshwant Patil

पेडणे : सिमेवरील जवानांमुळेच (Soldiers on Border) आम्ही मुक्तपणे जगू शकतो आणि सुखाची झोप घेऊ शकतो. सिमेवरील जवानांकडे शत्रूशी लढण्यासाठी शस्त्र असते, पण त्याहीपेक्षा प्रेमाने पाठवलेली राखी (Rakhi) शत्रूशी लढण्याचे मोठे बळ (Empower) देते, असे प्रतिपादन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांनी वझरी येथे केले.

चैतन्य प्रतिष्ठानच्या शारदा उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे नाना शेट सभागृहात आयोजित ‘एक राखी सैनिकांसाठी’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. याप्रसंगी शारदा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. गजानन मराठे, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रताप भेंडाळकर, सैन्य दलाचे हवालदार मोहंती, नौदलाचे कमांडर प्रियंवदा सिंग परी, नौदलाचे निवृत्त मुख्य अधिकारी नेव्ही अनंत जोशी, शारदा उच्च माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक श्रीधर शेणवी देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरवातीला राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे वझरी येथे आगमन होताच सुवासिनींनी आरती ओवाळून त्यांचे स्वागत केले. त्यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात झाली.
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर म्हणाले, की गेल्या आठ वर्षांपासून चैतन्य प्रतिष्ठानच्यावतीने सैनिकांना राखी जमा करण्याचा उपक्रम राबवला आहे. यादरम्यान जमा झालेल्या राख्या सैनिकांपर्यंत पोचवण्याचा योग आला नाही. मात्र, मी आता हिमाचल प्रदेशचा राज्यपाल झाल्याने सीमेवर शत्रूंशी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांना त्यांच्या प्रेमापोटी जमा झालेल्या राख्या पोचवणार आहे. प्रत्येक नागरिक हा देशाच्या घटनेशी बांधील आहे. त्याप्रमाणे देशभक्ती जागृत करण्याची गरज आहे. सैन्य दलाचे हवालदार मोहंती म्हणाले, की देशाची सेवा करताना आम्हाला आमच्या कुटुंबापासून महिनोंमहिने दूर राहावे लागते आणि अचानक प्रेम भावनेने एक राखी आम्हाला शत्रूंशी लढण्याचे बळ देऊन जाते. राखीच्या धाग्यात राष्ट्रप्रेमाची, देशभक्तीची ताकद आहे. अनंत जोशी म्हणाले, राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन एकदा मोहिमेवर गेल्यावर कित्येक दिवस सभोवतालच्या भागाशिवाय कुणीही दिसत नाही. ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा कार्यक्रम गावागावांत व्हावा.

सैनिकांसाठी ४४५० राख्या
वझरी येथील शारदा उच्च माध्यमिक विद्यालय तसेच तालुक्यातील इतर २७ शाळा आणि विविध संस्था यांच्याकडून सुमारे ४४५० राख्या जमा झाल्या असून त्या हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केल्या. आपण या राख्या सीमेवर सैनिकांपर्यंत स्वतः जबाबदारीने पोचत्या करणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT