Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Lovelina Borgohain Gold Medal Asian Games 2026: भारताची स्टार ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने एशियन गेम्स 2026 मध्ये 75 किलो वजनी गटात चीनच्या बाओ जीयीचा रोमांचक सामन्यात पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
Lovelina Borgohain Gold Medal Asian Games 2026
Lovelina Borgohain Gold Medal Asian Games 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Lovelina Borgohain Gold Medal Asian Games 2026: भारताची स्टार ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने एशियन गेम्स 2026 मध्ये 75 किलो वजनी गटात चीनच्या बाओ जीयीचा रोमांचक सामन्यात पराभव करत सुवर्णपदक पटकावले. महिला बॉक्सिंगमध्ये भारताला तब्बल 12 वर्षांनंतर हे सुवर्णपदक मिळाले. विशेष म्हणजे, लवलीनासाठी हा विजय अत्यंत खास ठरला, कारण तिने हा ऐतिहासिक पराक्रम आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केली. तिने देशवासीयांना मोठी भेट दिली. या शानदार विजयामुळे संपूर्ण देशातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

याआधी हांगझोऊ एशियन गेम्समध्ये तिचे सुवर्णपदक थोड्यासाठी हुकले होते आणि यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही तिला रौप्य पदकावर समाधान मानवे लागले होते. महिलांच्या 75 किलो वजनी गटातील या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात सुरुवातीपासूनच रोमांचक थरार पाहायला मिळाला. पहिल्या राउंडमध्ये चिनी खेळाडूने आक्रमक पवित्रा घेतला, परंतु लव्हलिनाने आपल्या अनुभवाचा आणि उत्कृष्ट संयमाचा परिचय देत हुशारीने गुण मिळवले आणि पहिला राउंड 3-2 ने आपल्या नावावर केला. त्यानंतर दुसऱ्या राउंडमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीची टक्कर झाली, पण लव्हलिनाने बाजी मारत हा राउंड 4-1 ने जिंकला आणि सामन्यात 2-0 अशी भक्कम आघाडी घेत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले.

Lovelina Borgohain Gold Medal Asian Games 2026
Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

तिसऱ्या आणि अंतिम राउंडमध्ये तर लव्हलिनाने पूर्णपणे आपला दबदबा निर्माण केला आणि चीनी खेळाडूला कोणतीही संधी न देता हा राउंड 5-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता इतर भारतीय बॉक्सर परवीन आणि अंकुश यांच्या आगामी सुवर्णपदकाच्या सामन्यांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले. या सुवर्णयशासह भारताच्या (India) पदकतालिकेत मोठी भर पडली असून, एशियन गेम्समधील भारताची घोडदौड दिमाखात सुरु आहे. लव्हलिनासारख्या चॅम्पियन खेळाडूने वाढदिवसाच्या दिवशी मिळवलेले हे यश भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com