Goa Rajya Navnirman Aghadi was formed for hardworking Bhumiputra Dainik Gomantak
गोवा

कष्टकरी भूमिपुत्रांसाठी गोवा राज्य नवनिर्माण आघाडी

पैसा नसल्याने सरकार कर्जबाजारी झाले आहे. गोवा सरकारवर 40 हजार कोटींचे कर्ज आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळत नाहीत.

दैनिक गोमन्तक

फोंडा: सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या भ्रष्टाचारी भाजपला (BJP) सत्तेवरून खाली खेचण्यासाठी खाण अवलंबित, शेतकरी आणि कष्टकरी भूमिपुत्रांची (Bhoomiputra Goa) गोवा राज्य नवनिर्माण आघाडी स्थापन करण्यात आली असून गोवा राज्य नवनिर्माणासाठी हा फोरम कार्यरत राहील, अशी घोषणा कामगार नेते तथा गोवा खाण मंचचे अध्यक्ष पुती गावकर यांनी केली. साखळी मतदारसंघात सर्वपक्षीयांचा पाठिंबा मिळाल्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) उमेदवारी दाखल करणार, असेही ते यावेळी म्हणाले.

संदेश गावस तसेच इतर उपस्थित होते. तिस्क - फोंडा येथे गुरुवारी या फोरमचे उदघाटन केल्यानंतर पुती गावकर म्हणाले, बंद खाणी, शेतकरी समस्यांच्या गर्तेत, वाढती बेरोजगारी आणि पर्यटन धोरण फसलेले आहे. लोक कठीण परिस्थितीतून जात असताना भाजपचे नेते स्वतःची तुंबडी भरत आहेत. गोमंतकीय युवक रोजगार नसल्याने वैफल्पग्रस्त झाला आहे, तर भाजप सरकार नोकरीचे गाजर दाखवत आहे. सरकारी नोकऱ्या विकल्या जात आहेत. पैसा नसल्याने सरकार कर्जबाजारी झाले आहे. गोवा सरकारवर 40 हजार कोटींचे कर्ज आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळत नाहीत. त्यामुळेच शेतकरी, कष्टकरी समाज, खाण अवलंबितांचे प्रश्न घेऊन हा फोरम राजकीय मैदानात उतरणार असल्याचे गावकर यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षांना पाठिंबा

हा फोरम भाजपविरोधी राजकीय पक्षांना पाठिंबा देणार असून आघाडीतर्फे साखळी, मये, डिचोली, पर्ये, वाळपई, सावर्डे, कुडचडे, सांगे, केपे, मुरगाव, वास्को येथे उमेदवार उभे करण्यात येतील किंवा समविचारी पक्षांना पाठिंबा देण्यात येईल. मी गोवा खाण मंचचा अध्यक्ष आहे. खाणी सुरू करण्यासाठी हा मंच स्थापन केला आहे. त्यामुळे या मंचमध्ये सर्वपक्षीय सहभागी आहेत. या मंचचा नव्याने स्थापन झालेल्या फोरमशी थेट संबंध नाही, असेही गावकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT