Rajendra Arlekar Dainik Gomantak
गोवा

Goa: राजेंद्र आर्लेकरांची राज्यपालपदी नियुक्ती; मयेवासियांसाठी 'सोनेरी' क्षण

डिचोलीतील मये गावचे सुपूत्र तथा माजी सभापती आणि माजी मंत्री आदरणीय राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी (Governor of Himachal Pradesh) नियुक्ती.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोलीतील मये गावचे सुपूत्र तथा माजी सभापती आणि माजी मंत्री आदरणीय राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी (Governor of Himachal Pradesh) नियुक्ती झाल्याबद्दल मये गावात आनंदमय वातावरण पसरले आहे. मये गावासाठी हा अभिमानास्पद तेवढाच 'सोनेरी' क्षण असल्याच्या प्रतिक्रिया गावात व्यक्त होत आहेत.

दरम्यान, मये भू -विमोचन नागरिक कृती समितीचे सचिव प्रा. राजेश कळंगुटकर, माजी सरपंच सखाराम पेडणेकर, अशोक गावकर, रोहिदास वायंगणकर, कालिदास कवळेकर यांच्यासह पिळगावचे माजी सरपंच रामचंद्र गर्दे यांनी बुधवारी वास्को येथे श्री. आर्लेकर यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल आदरणीय राजेंद्र आर्लेकर यांचे अभिनंदनही या कार्यकर्त्यांनी केले. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत प्रेमाचे प्रतीक म्हणून विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती भेट दिली. राजेंद्र आर्लेकर यांची राज्यपालपदी नियुक्ती ही मयेतील जनतेसाठी भूषणावह अशी घटना आहे. असे मत प्रा. राजेश कळंगुटकर आणि रामचंद्र गर्दे यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT