Goa Rajbhavan Jackfruit Festival 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Jackfruit Festival: गोव्याच्या राजभवनात 'फणस महोत्सव'; देशातील 3 राज्यपालांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त केली होती फणसाच्या रोपांची लागवड

Akshay Nirmale

Goa Rajbhavan Jackfruit Festival 2023: गोव्याच्या राजभवनात शनिवारी, 11 जून रोजी फणस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित या जॅकफ्रुट फेस्टिव्हलला देशातील 3 राज्यांचे राज्यपाल उपस्थित होते.

तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदराराजन, बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आणि गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यावेळी प्रमुख उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त रोजी गोव्याच्या राजभवन कॅम्पसमध्ये 71 आयुरजॅक जातीच्या फणसाच्या रोपांची लागवड करून जॅकफ्रूट बाग सुरू करण्यात आली होती.

या बागेतील झाडांना लागवडीच्या तारखेपासून 20 महिन्यांनी फळे येण्यास सुरुवात झाली आहे आणि ते काढणीसाठी तयार आहेत. परिसरात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे जॅकफ्रूट्स कार्यक्रमस्थळी प्रदर्शित केले गेले होते. यावेळी गोव्यातील विविध मान्यवरदेखील उपस्थित होते.

फणसाला दैनंदिन जीवनात मोठे महत्व आहे. दक्षिण भारतातील अनेक घरांच्या पारंपरिक मेन्यूचा फणस हा अविभाज्य भाग आहे. अनेक गोमंतकीयांकडून जॅकफ्रुटची लागवड केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

SCROLL FOR NEXT