Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: राजभवनात नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची तयारी जवळपास पूर्ण; CM सावंत ठरवणार वेळ आणि तारीख

Goa Politics: गावडे यांच्या जागी विधानसभेचे सध्याचे सभापती रमेश तवडकर यांचे नाव संभाव्य मंत्री म्हणून पुढे येत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राजभवनाच्या नव्या दरबार सभागृहात होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने तयारीचा शेवटचा टप्पा गाठला आहे. शपथविधी दरम्यान मंत्री वाचत असलेल्या शपथपत्रांच्या प्रती गुरुवारी (२९ मे) तयार करण्यात आल्या असून, संभाव्य निमंत्रितांची यादीही अंतिम केली गेली आहे. आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळ व दिनांक निश्चित होणे बाकी असून, त्यानंतर शपथविधीच्या सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या उपस्थितीत गुरुवारी (२९ मे) सायंकाळी भाजप कार्यालयात होणारी बैठक अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत आगामी शपथविधी आणि संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलावर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणावर लक्ष ठेवून असलेल्या निरीक्षकांसह जनतेचेही लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

या पार्श्वभूमीवर कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यांच्या काही आक्षेपार्ह विधानांमुळे पक्षांतर्गत अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यांना वगळण्याचा दबाव भाजपच्या काही गटांतून वाढला आहे. गावडे यांच्या जागी विधानसभेचे सध्याचे सभापती रमेश तवडकर यांचे नाव संभाव्य मंत्री म्हणून पुढे येत आहे.

राजकारणात भरणार नवे रंग

या घडामोडींनी मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या इतरांच्या हालचालींना गती मिळाली असून, राजकीय समीकरणांमध्ये लवकरच बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शपथविधीची अधिकृत घोषणा होताच, राज्याच्या राजकारणात नवे रंग भरले जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, कालपासून या विषयावर बोलणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टाळले आहे. त्यांचे हे मौन सूचक मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT