Raj Bhavan Goa Dainik Gomntak
गोवा

Raj Bhavan Goa: खुशखबर! गोवा मुक्ती दिनानिमित्त राजभवन सर्वसामान्यांसाठी खुला

Raj Bhavan Goa: गोव्याच्या ऐतिहासिक राजभवनाची सफर करण्यासाठी नाव नोंदणीला 18 डिसेंबरची मुदत

गोमन्तक डिजिटल टीम

Raj Bhavan Goa:- गोवा मुक्तीदिनी गोमंतकीयांना आनंदाचे क्षण अनुभवता येणार आहे. गोवा मुक्ती दिनी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या वेळेत गोव्याचे राजभवन सर्वसामान्यांसाठी खुले असेल.

ज्या लोकांना राजभवन आणि पॅलेस पाहण्याची इच्छा आहे त्यांनी 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत राजभवनच्या मुख्य गेटवर नाव नोंदणी करावी असे सांगण्यात आले आहे. तसेच राजभवन पाहण्यासाठी येणाऱ्यांनी आपले फोटो आयडी आणि आधार कार्ड सोबत ठेवावे लागले.

पणजी लगतच्या दोनापावला येथील गोव्याची राजभवन ही वास्तू ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे‌. राजभवन हा एक निवासी राजवाडा आणि किल्ला असून तो गोव्याच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान म्हणून ओळखले जातो. गोव्याच्या राजभवनाला पोर्तुगीजकालीन इतिहास आहे.

गर्द झाडीने वेढलेल्या जागेवर पोर्तुगीजांनी एका राजवाड्याचे बांधकाम केले. 1540 मध्ये गोव्याच्या आठव्या गव्हर्नरने म्हणजे दि एस्टेव्हो दि गामा याने याच परिसरातील जांभा दगड उकरुन या किल्ल्याची बांधणी केली.

पुढे सन 1594 मध्ये या राजवाड्याला अधिकृतरित्या गव्हर्नरचे निवासस्थान म्हणून घोषीत केले गेले. आज मात्र या वास्तूचा पूर्ण कायापालट झाला आहे. भारतातील कोणत्याही राज्यपालाच्या निवासाला इतका चारशे वर्षाचा इतिहास लाभलेला नाही.

एका बाजुला मांडवी नदी आणि एका बाजूला समुद्र यामुळे इथे बसलेल्या व्यक्तीला आपण जहाजाच्या डेकवर उभा असल्याची भावना होते. अशा नयनरम्य ठिकाणी जाण्याचा आणि या गोष्टी जवळून पाहण्याचा अनुभव गोमंतकीयांना घेता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manoj Bajpayee at IFFI: ‘..श्रीकांत तिवारी इज कमिंग’! इफ्फीत ‘द फॅमिली मॅन’चा खास शो; मनोज वाजपेयीची धाकड एन्ट्री

Goa Politics: 'गोमंतकीय जनतेला भाजप सरकार नकोय'! आरजीपीचा हल्लाबोल; फुटीरांना पक्षप्रवेश नको याबाबत परब ठाम

Bhutani Project: भूतानी प्रकल्पाच्या बांधकामाला 'ग्रीन सिग्नल'! आरोप तथ्यहीन असल्याचे खंडपीठाचे निरीक्षण; याचिका फेटाळल्या

Goa Politics: खरी कुजबुज; युरीच्या स्वप्नातील ‘गोवा’ अस्तित्वात येणार ?

'..मोबाईल कमी वापर'! आई ओरडली; 12 वर्षांची मुलगी दिल्लीच्या ट्रेनमध्ये चढली; घर सोडून गेलेली गोव्यातील 3 मुले सापडली उत्तर भारतात

SCROLL FOR NEXT