Goa Rain Updates
Goa Rain Updates  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update : आजपासून पुढील चार दिवस राज्यात यलो अलर्ट

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून जेवढ्या मुबलक प्रमाणात पाऊस बरसायला हवा होता तेवढा बरसला नाही. परंतु आज बुधवारपासून पुढील चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेद्वारे वर्तवण्यात आली आहे.

पुढील चार दिवस राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या 24 तासात राज्यात 6.4 से.मी मीटर म्हणजेच 2.5 इंच पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 5 आणि 6 ऑगस्ट रोजी पावसात अधिक वाढ होणार असून दिवसभरात प्रत्येकी 11.5 से.मी. म्हणजेच 4.5 इंच पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 9.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आजतागायत एकूण 2027 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

राज्यात सोमवारपासूनच नव्या मच्छीमार हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र पुढील पाच दिवसांसाठी गोवा तसेच कर्नाटक तटीय मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या सरींसोबतच 40 कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची उपस्थिती तसेच सध्याच्या स्थानावरून शिअर झोनचे उत्तरेकडे सरकण्याच्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. उद्या व परवा राज्यात पावसाचे प्रमाण कमी असेल. मात्र, शुक्रवार व शनिवारी पाऊस अधिक प्रमाणात असेल, अशी माहिती एम. राहुल यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Green Chilli Price Today : पणजी बाजारात गावठी मिरचीला मोठी मागणी

Loksabha Election : दक्षिण गोव्‍यातील ख्रिस्‍ती मतेही भाजपलाच; दामू नाईक, उल्‍हास तुयेकर यांचा दावा

CBSE Latest Update: सीबीएसई रिझल्टपूर्वी मोठी बातमी! बोर्डाने जारी केला ॲक्सेस कोड; जाणून घ्या

Panaji News : ‘तनिष्का पुरुमेंत फेस्त’ला प्रतिसाद; खवय्यांना पर्वणी

Lemon Rate In Goa : तप्त उन्हात लिंबू खातोय भाव; दरात वाढ

SCROLL FOR NEXT