Rain in Goa | Goa Weather Updates
Rain in Goa | Goa Weather Updates Dainik Gomantak
गोवा

येत्या तीन दिवसात राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता - IMD

Sumit Tambekar

राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे. वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार 12.13,14, 15 सप्टेंबर रोजी राज्यात बहुतेक ठिकाणी पाऊस असणार आहे.

गणेश उत्सव साजरा झाला अन् पावसाने जोर धरल्याने नागरिकात काहीसे समाधानाचे वातावरण असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसात राज्यातील काही भागात पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. त्यामूळे काहीसे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. जुलैच्या शेवटपासून ऑगस्ट महिन्यात कमी झालेला पाऊस, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सक्रिय झाला आहे.

सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यामध्ये

आतापर्यंतच्या नोंदीनुसार सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यामध्ये झाला असून 5 जुलैला तो 156.2 मिलिमीटर तर 8 जुलैला या वर्षातला सर्वाधिक म्हणजे 161.7 मिलिमीटर कोसळला. मात्र, पुढे 18 जुलैपासून पावसाची गळती सुरू झाली. आणि तो 7 सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा कमीच होता.

ऑगस्ट महिन्यातला यावर्षीचा पाऊस तर अलीकडील काळातला सर्वात कमी पाऊस आहे. 6 ऑगस्ट रोजी झालेला 40.5 मिमी आणि 9 ऑगस्ट रोजी झालेला 37.2 मिमी पाऊस वगळता संपूर्ण ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडला. त्यातही 29 आणि 30 जुलैला सर्वात अत्यल्प पावसाची नोंद झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

पेरु देशाचा मोठा निर्णय! ट्रान्स लोकांना केले 'मानसिक रुग्ण' घोषित; सरकार देणार मोफत उपचार

SCROLL FOR NEXT