Goa rain update | Goa yellow alert weather Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: गोव्यात मुसळधार! राज्यात चार दिवस यलो अलर्ट; महाराष्ट्रालाही पावसाने झोडपले

Goa Weather update: मराठवाडा, विदर्भ, खानदेशासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Monsoon 2025

पणजी: राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता वाढली आहे. सोमवारी (१८ ऑगस्ट) पहाटेपासूनच जोरदार पावसाची बरसात सुरू आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. रस्ते पाण्याखाली गेले.

दरम्यान, गोव्यात मंगळवारपासून (१९ ऑगस्ट) पावसाची तीव्रता काही अंशी कमी होण्याची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याने गोवा वेधशाळेद्वारे पुढील चार दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

मुंबईसह सर्वदूर महाराष्ट्रात सोमवारी (१८ ऑगस्ट) पहाटेपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. परिणामी, महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीतील सखल भागांत पाणी साचल्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेशासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, काही भागात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ६ मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे मराठवाड्यात जणांचा मृत्यू झाला आहे. यात नांदेड जिल्ह्यातील ३, बीड जिल्ह्यातील २ व हिंगोली जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे पावसामुळे बिकट स्थिती निर्माण झाल्यामुळे तिथे लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT