Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update : ‘मुसळधार’ चा बळीराजाला फटका; मयेत शेती पाण्याखाली

Goa Weather : शेतकऱ्यांची मेहनत आणि आतापर्यंत खर्च केलेले पैसेही वाया गेले आहेत. शेतकऱ्यांना आता नव्याने तरव्याची पेरणी करावी लागणार आहे. जोरदार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली येताना डिचोलीतील मयेसह काही भागात वरती आलेल्या ‘तरव्या’ चा धूप झाला आहे.

पावसामुळे ‘रुजून’ वर आलेला ‘तरवा’ वाहून गेला असून, मोठ्या जोमाने शेतीत उतरलेल्या बळीराजावर कपाळावर हात मारायची पाळी आली आहे. ‘मुळाक खाजन’ ही शेती पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

तरव्याची पूर्ण नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांची मेहनत आणि आतापर्यंत खर्च केलेले पैसेही वाया गेले आहेत. शेतकऱ्यांना आता नव्याने तरव्याची पेरणी करावी लागणार आहे. जोरदार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

आता बियाणेही मिळत नाहीत

बियाणे आणि तरवा रुजत घालण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना किमान आठ ते दहा हजार खर्च आलेला होता. पुन्हा तरवा पेरावा लागणार आहे. आता बियाणेही मिळत नाही, अशी खंत नागेश नाईक गावकर, शेखर शिरोडकर आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी खात्याने शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT