Tree Uprooted on Miramar Road Dainik Gomantak
गोवा

एकीकडे कारशेडवर तर दुसरीकडे रस्त्याच्या मधोमध कोसळले झाड; राज्यात अग्निशमन दलाचे जवान ॲक्शन मोडमध्ये

राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याच्या काहीच दिवसात पडझडीच्या घटनांना सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Tree Uprooted on Miramar Road : राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याच्या काहीच दिवसात पडझडीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. मोठमोठी झाडे उन्मळून पडत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वेरे येथे अशीच एक घटना घडली आहे.

वेरे येथील कारशेडवर एक मोठे झाड कोसळले. यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर झाड हटविण्यासाठी पिळर्ण अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून कारशेडवरील झाड हटवण्यात आले.

अशीच घटना मिरामार रोडवरही घडली. रस्त्यावर एक झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र ताबडतोब पडलेले हे झाड अग्निशमन दलाच्या जवानांनी हटवले, वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

दरम्यान, दुतळे-मडकई येथील एका घरावर आंब्याचे झाड कोसळल्याने संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. दरम्यान, घटना घडली त्यावेळी घरात असलेले पती पत्नी घराच्या बाहेर धावत आल्याने सुदैवाने त्यांचा जीव बचावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT