Goa Railway  Dainik Gomantak
गोवा

Goa Railway: काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा द्या!

काणकोण रेल्वे स्थानकावर कोविड महामारीपूर्वी ज्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबा घेत होत्या त्या रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या, अशी मागणी आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Railway: काणकोण रेल्वे स्थानकावर कोविड महामारीपूर्वी ज्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबा घेत होत्या त्या रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या, अशी मागणी आहे.

ती मान्य करून घेण्यासाठी शुक्रवार, 13 रोजीपासून रेल्वे थांबण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे काणकोण रेल्वे स्थानकावर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय ज्येष्ठ नागरिक मंच, स्वाभिमानी जागृत काणकोणकार, जनसेना व अन्य संघटनांच्या संयुक्त बैठकीत जाहीर घेण्यात आला.

काणकोणच्या ज्येष्ठ नागरिकांनी ही समस्या सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी सर्व प्राधिकरणांशी पत्रव्यवहार केला आहे आणि काणकोणच्या लोकांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्याची विनंती केली आहे; परंतु त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

काणकोण येथे ज्येष्ठ नागरिकांनी 1999 मध्ये कोकण रेल्वेच्या समर्थनार्थ झालेल्या त्यावेळच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. काणकोणातील लोकांना कोकण रेल्वे प्रकल्पाचा लाभ मिळेल या अपेक्षेने लोकांनी आपल्या मौल्यवान जमिनी कवडीमोल भावात दिल्या;

परंतु काणकोणकरांना मिळालेल्या वागणुकीने या लोकांना निराश केले आहे, अशी भावना ज्येष्ठ नागरिक शांताजी नाईक गावकर यांनी या बैठकीत व्यक्त केली.

आमदार-खासदार अयशस्वी

दक्षिण गोव्याचे खासदार, स्थानिक आमदार, राज्य सरकार काणकोणकरांच्या न्याय्य मागणीची दखल घेण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले आणि या रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाड्या थांबविण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. काणकोणवासीयांचा त्यांना विसर पडला, असा आरोप जनसेनेचे जनार्दन भंडारी यांनी केला.

पर्यटन व्यवसायावर परिणाम

यावेळी काणकोण पालिकेचे नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी कोकण रेल्वेला काणकोण स्थानकावर थांबा नसल्याने येथील पर्यटन व्यवसायावर याचा फार मोठा परिणाम झाला आहे. पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेल्यांचे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांच्या संकटात वाढ झाल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT