Rahul Gandhi Dainik Gomantak
गोवा

गोव्यात राहुल गांंधींची फुटबॉल किकसह बाईक सवारी

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे (Assembly Elections) बिगुल अत्तापासूनच वाजू लागले आहे.

दैनिक गोमन्तक

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे (Assembly Elections) बिगुल अत्तापासूनच वाजू लागले आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही (Goa) विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप आपल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मतदारासमोर माडंत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस (Congress), तृणमूल कॉंग्रेस, आपसह स्थानिक पक्ष सत्तेत असणाऱ्या भाजपवर (BJP) निशाणा साधत आहेत. तसेच अनेक राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी प्रचारसभा घेत गोव्यातील जनतेला रिझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एक दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या राज्य युनिटने राहुल गांधींचा व्हिडिओ देखील ट्विट केला आहे. ज्यामध्ये ते मोटरसायकल, टॅक्सी 'पायलट' वरुन गोव्यातील आझाद मैदानातील हुतात्मा स्मारकावर पोहोचले. जिथे त्यांनी शहिदांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

दरम्यान, आपल्या गोवा दौऱ्यात राहुल गांधी यांनी आज सकाळी वेल्साव या किनारी गावात मच्छिमारांशी संवाद साधला. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीबाबत ते म्हणाले की, गोव्यातील जनतेचा आवाज बनून त्यांच्या हिताचे रक्षण करणे हे आमचे ध्येय आहे. आमचा पक्ष निवडणूक प्रचारादरम्यान लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यावर आणि त्यांच्या समस्या दूर करण्यावर भर देत आहे. पायाभूत सुविधा आणि राज्याचे ‘कोल हब’ बनण्याचे मुद्देही राहुल यांनी उपस्थित केले. तसेच आम्ही गोव्याला कोल हब होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यामुळे येथील पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

ते पुढे म्हणाले की, तीन पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे गोवा उद्ध्वस्त होत आहे. यामध्ये रेल्वे ट्रॅक, महामार्गांचे विस्तारीकरण आणि नवीन पॉवर लाईनचा समावेश आहे. यामुळे येथील प्राचीन जंगलांचे नुकसान होत असून कोळशाच्या धुळीमुळे शहरे प्रदूषित होत आहेत. मोलेम नॅशनल पार्क आणि जैवविविधता हॉटस्पॉट भगवान महावीर अभयारण्याभोवती सुरु असलेल्या प्रकल्पांविरोधात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर निषेध नोंदवण्यात आला आहे. लोक सतत "सेव्ह मोलेम" आणि "नो टू कोल" मोहीम राबवत आहेत. आमचा पक्ष राज्यातील असुरक्षित स्थानिक लोकांच्या हिताचे रक्षण करण्याचे वचन देतो.

शिवाय, गोव्यातील तळेगाव येथील एसपीएम स्टेडियममध्ये काँग्रेस कार्यकर्ता अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गर्दीत फुटबॉलला लाथही मारताना दिसले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT