post office  Dainik Gomantak
गोवा

Quepem : केपेत पोस्ट मास्टरचा ग्राहकांच्या पैशांवर डल्ला; हडपले 'इतके' लाख रुपये

गुन्हा दाखल, अधिक तपास सुरु

गोमन्तक डिजिटल टीम

पोस्टातील खात्यामध्ये ग्राहकांचे पैसे जमा न करता ते हडप केल्याची प्रकार समोर आला आहे. हा प्रकार केपे येथे घडला आहे. याप्रकरणी शेल्डेच्या पोस्टमास्टरांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही हडप केलेली रक्कम सुमारे 3 लाख एवढी आहे. याबाबतची तक्रार फोंडा उपविभाग पोस्ट खात्याच्या पोस्ट निरीक्षकांनी केपे पोलिसांत दाखल केली आहे.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोंडा उपविभाग पोस्ट खात्याचे पोस्ट निरीक्षक धीरज चव्हाण यांनी शेल्डे विभागाचे पोस्ट मास्टर साहिल नाईक यांनी २९ जुलै ते ७ सप्टेंबर 2022 या कार्यकाळात ग्राहकांनी जमा करण्यासाठी दिलेले 2 लाख 90 हजार 660 रुपये खात्यात जमा न करता ते परस्पर हडप केल्याची तक्रार दाखल केली आहे. चव्हाण यांनी साहिल यांच्याकडून सदर रक्कम व्याज तसेच दंडात्मक व्याजासकट वसूल करून ते सरकारी तिजोरीत जमा केल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी केपे पोलिसांनी शेल्डेचे पोस्टमास्तर साहिल नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

SCROLL FOR NEXT