Nilesh Cabral Danik Gomantak
गोवा

...म्हणून पीडब्ल्यूडीची कामे रखडली- मंत्री निलेश काब्राल

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांत तीव्र नाराजी

Sumit Tambekar

गेले काही दिवस राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर बरीच चर्चा झाली आहे. पावसाळ्यात उद्भभवणाऱ्या समस्या, वाहतूक व्यवस्थेतील अडथळे या समस्यांतून तातडीने नागरिकांची सुटका होणे आवश्यक आहे. ती काही अंशी कमी पडत असल्याने पीडब्ल्यूडीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

(Goa PWD works started at slow pace Minister Nilesh Cabral replied)

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केल्याने हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामूळे पीडब्ल्यूडी मंत्री निलेश काब्राल यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मनुष्यबळाअभावी राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागावर ताण येत आहे. खात्यात अभियंत्यांची 50 टक्के पदे रिक्त आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णक्षमेतेने काम करु शकत नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

...तर काम कसं करणार ?

मनुष्यबळच कमी असेल तर काम कसं करणार ? यामूळेच विभागाच्या कामकाजात अडथळा येत आहे. तसेच आपण एकटा सगळीकडे जाऊ शकत नाही. राज्याचे मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव आहेत. त्यांच्याकडे ही पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांच्यावर ही कामाचा ताण आहे. आणि यामूळेच सार्वजनिक खात्याच्या फाईल्स रखडत आहेतत. असे ही ते म्हणाले. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं काब्राल म्हणाले आहेत.

या समस्यांवर उपाय काय ? यावर बोलताना काब्राल म्हणाले की, कामाकाजाची गरज पडल्यास नवे सचिव नेमण्याबाबतही निर्णय होऊ शकतो. ज्यामूळे सार्वजनिक बांधकाम खाते अधिक गतीने कार्यरत होण्यास मदत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

SCROLL FOR NEXT