Goa PWD department Dainik Gomantak
गोवा

Goa PWD: राज्यात पीडब्ल्यूडीचे दोन विभाग होण्याची शक्यता? अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हातात

Goa Government: सार्वजनिक बांधकाम विभागाचा दोन विभाग वेगळे करण्याचा निर्णय सध्या गोवा राज्य सरकारने विचारात घेतला आहे

Akshata Chhatre

पणजी: सार्वजनिक बांधकाम विभागाचा दोन विभाग वेगळे करण्याचा निर्णय सध्या गोवा राज्य सरकारने विचारात घेतला आहे. या नवीन प्रस्तावानुसार गोव्यात पूल आणि रस्ते यांसारख्या प्रकल्पांसाठी एक विभाग तर इतर कामांसाठी वेगळा विभाग तयार करण्याचा विचार सुरु आहे मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

गोवा सरकार सध्या या प्रस्तावाच्या विचारात आहे. यापूर्वी सरकारकडून मलनिस्सारण महामंडळ वेगळे करण्यात आले होते आणि त्यानंतर आता पूल, रस्ते आणि इतर बांधकाम प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागातून वेगळे करण्याचा विचार सुरु आहे. सरकारने जर का या निर्णयाला संमती दिली तर पूल आणि रस्ते बांधकाम सोडल्यास बाकी बांधकाम प्रकल्प वेगळे होण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्ते, पूल, इमारतींचे बांधकाम असे प्रकल्प येतात. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळ स्थापन केले होते आणि याअंतर्गत काही सामाजिक प्रकल्प आणि बांधकामे देण्यात आली होती. सध्या राज्यात पीडब्ल्यूडीकडे रस्त्यांवरील छोटे पूल, रस्ते, पाणी पुरवठा किंवा सरकारी इमारतींचे काम पाहतंय आणि काही दिवसांत यामध्ये देखील विभाजन करण्याचा सरकारचा विचार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यात मुख्यमंत्र्यांच्या अख्त्यारीखाली येतो. याबद्दल माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभाजनाचे काम प्रस्तावित असल्याची माहिती दिली, यावर अद्याप निर्णय झालेला नाही मात्र विभागणी होऊ शकते असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT