Drinking Water Goa Dainik Gomantak
गोवा

Goa PWD: मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!! गोवेकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार; नवीन विभाग सुरु होणार

CM Dr. Pramod Sawant: राज्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी लवकरच पिण्याच्या पाण्याचा वेगळा विभाग सुरु केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी केलीये

Akshata Chhatre

पर्वरी: गोव्यातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या लोकांना सतावत आहे. पर्वरीत बुधवारी( १२ फेब्रुवारी) रोजी झालेल्या पाईपलाईन बांधकामाच्या पायाभरणी समारंभात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी लवकरच पिण्याच्या पाण्याचा वेगळा विभाग सुरु केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी केलीये.

पर्वरी मतदारसंघाचा विकास व्हवा म्हणून आमदार आणि पर्यटनमंत्री रोहन खवंटे कार्यरत आहेत. राज्यभरातील कोमुनिदाद जमीन मालकांनी जर का असेच सहकार्य केले तर जमिनीचा प्रश्न सुटेल आणि सरकार स्थानिकांची अधिकाधिक मदत करू शकेल असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले आहेत.

जलाशयांमध्ये पाणी पुरवठा करणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन देखील मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले.

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वयंपूर्ण गोव्याच्या दिशेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गोव्यात १६ क्युबिक मीटरपर्यंत पाणी वापरणाऱ्या स्थानिकांना सरकारकडून पाण्याच्या बिलाची वसुली केली जात नाही, त्यामुळे सर्वांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. गरजेशिवाय भाटांमध्ये किंवा गाड्या धुण्यासाठी पाण्याचा अधिकाधिक वापर करू नये असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT