Goa PWD Water Connection: Dainik Gomantak
गोवा

Goa PWD: सावधान! आता 2 महिने पाणी बिल न भरल्यास होणार 'ही' कारवाई

सावर्जनिक बांधकाम विभागाची अधिसूचना

Akshay Nirmale

Goa PWD Water Connection: गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) गुरुवारी पाणीपुरवठ्याबाबत अधिसूचित केलेल्या नवीन निकषांनुसार आता दोन महिन्यांपर्यंत बिल न भरल्यास पाणीपुरवठा कनेक्शन तोडण्यात येणार आहे. आणि त्यासाठी पूर्णतः ग्राहकच जबाबदार असेल, असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.

दोन महिन्यांहून अधिक काळ पाणी बिल न भरल्यास कनेक्शन तोडण्यास जबाबदार ग्राहकच जबाबदार असेल.

पाणी पुरवठा खंडित झाल्यानंतर लगेचच, सहायक अभियंता अशी प्रकरणे कार्यकारी अभियंत्याकडे थकबाकीच्या वसुलीसाठी पाठवतील. त्यांना या प्रकरणांत जिल्ह्याधिकाऱ्यांमप्रमाणे निर्णयाचे अधिकार असतील.

कार्यकारी अभियंता आता प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी दुपारी 3 ते 5 या वेळेत याबाबतची प्रकरणे हाताळतील. एक सहायक अभियंता (महसूल) यात त्यांना मदत करेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

घरगुती पाण्याचे कनेक्शन असताना इतर कारणांसाठी पाणी वापरल्याचे लक्षात आल्यास नवीन नियमांनुसार पाणी कनेक्शन तोडले जाईल. ग्राहकाकडून पाईपलाईन्सचे नुकसान झाल्यास, अस्वच्छ पाणीपुरवठा, पाणी वाया जाणे आढळून आल्यासही कनेक्शन तोडले जाईल.

नवीन नियमानुसार पाइपिंग सिस्टीमची तपासणी आणि मीटर रीडिंग पडताळणीसाठी प्रवेश नाकारल्यावरही पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.

ज्या कारणामुळे पाणीपुरवठा खंडीत केला आहे, त्यावर विशिष्ट शुल्क, दंड भरल्यानंतरच पाणीपुरवठा सेवा पुन्हा सुरू केली जाईल. सर्व थकबाकी भरल्यानंतर पुन्हा कनेक्शन दिले जाईल. नवीन निकषांनुसार सहाय्यक अभियंता (महसूल) यांना सर्व प्रकारच्या बिलात दुरुस्तीची मुभा असेल.

पाणी पुरवठा बिलामध्ये आता सीवरेज नेटवर्क शुल्क, तसेच वसूली, कोणताही दंड आकारला जाईल.

दरम्यान, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना टँकरने कोणताही पाणीपुरवठा करण्यासाठी केवळ कार्यकारी अभियंत्याच्या लेखी पूर्वपरवानगीची गरज असेल, असेही नवीन नियमांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT