CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Purple Fest: उत्साही वातावरणात ‘पर्पल फेस्ट’ला प्रारंभ

देशातला पहिला विविधतेचा तसेच सर्वसमावेशकतेचा सोहळा म्हणून उत्सुकता लागलेल्या पर्पल फेस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात सुरुवात झाली.

दैनिक गोमन्तक

Goa: देशातला पहिला विविधतेचा तसेच सर्वसमावेशकतेचा सोहळा म्हणून उत्सुकता लागलेल्या पर्पल फेस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात सुरुवात झाली. आयनॉक्स परिसरात झालेल्या उद्‌घाटन सोहळ्यास गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, समाजकल्याण खात्याचे सचिव सुभाष चंद्रा, पणजीचे नगराध्यक्ष रोहित मोन्सेरात, दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, राज्य समाजकल्याण संचालिका संध्या कामत आदी मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती होती.

  ‘वुई केअर’ चित्रपट महोत्सवास मंत्री सुभाष फळदेसाई, सचिव ताहा हाजिक आणि क्युरेटर सतीश कपूर यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. या तीन दिवसीय चित्रपट महोत्सवामध्ये 6,००० हून अधिक गोमंतकीय विद्यार्थी सहभागी होतील. फीट इन दि सँड, इम्पॉसिबल, नॅशनल अँथम इन साइन लँग्वेज, टायनी स्टेप आदी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले.

पर्पल एक्स्पिरियन झोनमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठीचे विविध कक्ष उभारण्यात आले आहेत. यामध्ये दिव्यागांसह सर्वच लोकांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न आहे.

 यामध्ये फनडूक, फायदा, हेमोफिलिया सोसायटी गोवा, सेतू, समाज कल्याण कक्ष, आरोग्य कक्ष आणि जागृती मेळा असे विविध कक्ष आहेत. विविध संकल्पनांबाबत अधिक स्पष्ट आकलन घडवून आणण्याच्या उद्देशाने विविध कृती-उपक्रम राबविले जात आहेत.

करमळी तळ्यावर सकाळी झालेल्या ‘बर्ड वॉक’ उपक्रमात 69 प्रतिनिधी सहभागी झाले.     यामध्ये दृष्टिदोष असलेले 32, अंशतः अंध असलेले 15 आणि श्रवणदोष असलेले यादरम्यान त्यांनी विविध प्रकारच्या पक्ष्यांचे निरिक्षण केले.

 पर्पल रेन उपक्रमामध्ये दृष्टिदोष तसेच संज्ञानात्मक समस्या असलेला तसेच वुई आर वन चॅरिटेबल ट्रस्टचा संगीतकार रित्विक आर. राजा आणि शंकर महादेवन यांच्या ‘जॉयफुल कॉयर’ या उपक्रमाने गोवा मनोरंजन सोसायटीचा आवार सांगीतिक ऊर्जेने भारावून गेला. ‘पर्पल बायोस्कोप’ उपक्रमात ‘86’ हा चित्रपट सादर केला. चित्रपटात सांकेतिक भाषा दुभाषींच्या माध्यमातून चित्रपटाचा अर्थ सादर करण्यात आला आहे.

राज्यात दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. 80 टक्के दिव्यांगता असलेल्या व्यक्तीला मासिक 3,500 आणि इतर दिव्यांग व्यक्तीस मासिक 2,500 रुपये दिले जातात. दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षणाचे प्रमाणही अधिक आहे. राजधानी पणजी दिव्यांगप्रिय शहर बनविले आहे. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

Goa Assembly Live: तिसरा जिल्हा; मुख्यालयावरून आल्टन आक्रमक

IND vs ENG: मँचेस्टर कसोटी अनिर्णित, पण टीम इंडियाच्या नावावर लज्जास्पद विक्रम; 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

Goa Monsoon Vegetables: चिप्स, बर्गर, पिझ्झा नको! गोव्यातील विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळी रानभाज्यांचा आस्वाद

"गोयेंचो ताजमहाल सेंचुरी करता" कला अकादमीला आणखीन 20 कोटींचा खर्च; अधिवेशनापूर्वीच विजय सरदेसाईंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT