Goa Public Service Commission  Dainik Gomantak
गोवा

Public Service Commission Recruitment: भरतीत गुणवत्तेशी तडजोड नाहीच, राज्याच्या हितासाठी गुणवानांची निवड

लोकसेवा आयोगाच्या भरतीत गुणवत्तेशी तडजोड नाहीच : जुझे मान्युएल नरोन्हा

गोमन्तक डिजिटल टीम

Public Service Commission Recruitment गोवा लोकसेवा आयोगातर्फे सरकारी अधिकारी आणि राजपत्रित कर्मचाऱ्यांची भरती केली जात असली तरी अर्ज करणाऱ्यांपैकी एक टक्क्यापेक्षा कमी जणांनाच सरकारी सेवेची संधी मिळते. २०२१-२२ मध्ये विविध पदांसाठी १७ हजार २४६ जणांनी अर्ज केले होते.

त्यापैकी केवळ ३४४ जणांनाच मुलाखत देण्याची आणि १४६ जणांना प्रत्यक्षात सेवेत रुजू होण्याची संधी मिळाली. २०२२-२३ मध्ये १७ हजार १७७ अर्जदारांपैकी ३५३ जणांना मुलाखतीला बोलावले;

पण केवळ १४४ जणांची शिफारस नियुक्तीसाठी करण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांनी या आकडेवारीस दुजोरा देताना सांगितले की, आयोग कुठेही गुणवत्तेशी तडजोड करत नाही. पारदर्शी पद्धतीने कर्मचाऱ्यांची निवड होते.

२०१६ साली मी या पदावर आल्यापासून हजारभर जणांची शिफारस आयोगाने केली; पण एकाही उमेदवाराबाबत कोणताही प्रवाद नाही. माझा सेवेचा आणखी दीड वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. त्या काळातही कोणत्याही दबावाखाली न येता राज्याच्या हितासाठी गुणवानांची निवड सरकारी सेवेसाठी करण्याचे ठरवले आहे.

पात्र उमेदवारांचा अभाव

अनुसूचित जातींसाठी सहा पदे होती. मात्र, केवळ एकच उमेदवार पात्र आढळला. अनुसूचित जमातीसाठी ४४ पैकी १३ पदेच भरता आली. इतर मागासवर्गीयांची ९४ पैकी केवळ ३० पदे भरता आली आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटासाठी असलेली १३ पदे योग्य उमेदवारांअभावी भरता आलेली नाहीत. दिव्यांगांसाठीच्या २६ पैकी केवळ ४ पदे भरता आली आहेत.

‘आरटीआय’चे प्रमाण घटले

आयोगाच्या पारदर्शी कामामुळे माहिती हक्क कायद्यांतर्गत माहिती मागणाऱ्यांचे प्रमाणही घटले आहे. वर्षभरात केवळ ५५ जणांनी माहिती अधिकाराचा वापर आयोगाकडून माहिती घेण्यासाठी केला आहे, असे जुझे मान्युएल नरोन्हा यांनी सांगितले.

३८४ जणांना बढती

वर्षभरात आयोगाने ३८४ अधिकाऱ्यांची बढतीसाठी शिफारस केली. ७८ बढती पदांसाठी लायक उमेदवार आढळले नाहीत. यासाठी आयोगाने बढती समितीच्या ८१ बैठका घेतल्या.

हंगामी बढती बंद

आयोगाने हंगामी बढती ही पद्धतीच बंद केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात कोणालाही हंगामी बढती देण्याची शिफारस आयोगाने केलेली नाही, अशी माहिती नरोन्हा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT