Goa Recruitment DG
गोवा

सुवर्णसंधी! तरुणांनो लागा तयारीला, 'या' सरकारी विभागांमध्ये होणार भरती

GPSC Recruitment: गोवा लोकसेवा आयोगाने (जीपीएससी) विविध खात्यांतील १६ पदांसाठी भरती प्रक्रिया निश्चित केली आहे. त्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दहा पदांचा समावेश आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa PSC Veterinary Officer Recruitment

पणजी: गोवा लोकसेवा आयोगाने (जीपीएससी) विविध खात्यांतील १६ पदांसाठी भरती प्रक्रिया निश्चित केली आहे. त्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दहा पदांचा समावेश आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची दहा पदे राखीव असून, या पदासाठी मासिक वेतन ३९ हजार रुपये असणार आहे. या पदासाठी उमेदवाराची गोवा पशुवैद्यकीय मंडळाकडे नोंदणी झालेली असावी. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापकांच्या तीन पदांची भरतीही होणार असून, त्यांना ४५ हजार रुपये वेतन असेल. या पदासाठी संकेतस्थळावर आवश्यक पात्रता नमूद केली आहे.

कामगार खात्यांतर्गत ईएसआय इस्पितळात वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन हे पदही भरले जाणार आहे. शिवाय कारखाना आणि बॉयलर विभागात प्रकल्प अधिकारी हे पद रिक्त असून, तेही भरले जाणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यात उपसंचालक आणि संग्रहालय विभागात क्युरेटर हे पद ‘ट्रान्‍स्फर ऑन डेप्युटेशन’ या नियमानुसार भरण्यात येणार आहे.

...हेही महत्त्वाचे

अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचना पहाव्यात.

अर्जावर मोबाईल नंबर, ई-मेल आयडीचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

अर्जांची पूर्णत: छाननी झाल्यानंतर आयोगातर्फे पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निमंत्रित केले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या ७८ वेबसाईट्स ब्लॉक; गोवा पोलिसांचा दणका, दोघांना अटक

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Politics: मांद्रेतील जनतेच्या मनात कोण? मायकल लोबोंमुळे हवा तापली; अरोलकरांनी दिलं चॅलेंज

Goa Crime: धारदार शस्त्राने वडिलांचा जीव घेणारा प्रमोद 'मानसिक रुग्ण'; बहिणीचा पोलिसांसमोर खुलासा

Goa Electricity: फाईव्ह स्टार एसी, Led दिवे; वीज बचतीबाबत सरकारी कार्यालयांसाठी नवी नियमावली

SCROLL FOR NEXT