Goa Public Service Commission  Dainik Gomantak
गोवा

GPSC Exam: लोकसेवा आयोग परीक्षेबाबत महत्वाची बातमी, भरती प्रक्रियेत बदल होण्याचे संकेत

अभ्यास गटाची स्थापना

गोमन्तक डिजिटल टीम

Public Service Commission Examination इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तुलनेत सोपी असणारी गोवा लोकसेवा आयोगाची कनिष्ठ अधिकारी भरतीची परीक्षा उत्तीर्ण होणे सध्या राज्यातील उमेदवारांना कठीण झाले आहे. आयोगाच्या इतर परीक्षांतही उमेदवार उत्तीर्ण होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी नसल्याने अखेरीस आयोगाने भरती प्रक्रियाच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भरती प्रक्रियेत कोणता बदल करावा याची शिफारस करण्यासाठी आयोगाने अभ्यास गटाची स्थापना केली आहे.

आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांनी या माहितीस दुजोरा दिला. ते म्हणाले, गेली पाच वर्षे कनिष्ठ अधिकारीपदे भरण्याचा प्रयत्न आयोग करत आहे, परंतु त्यापैकी चार ते पाचजणच उमेदवार एकावेळी सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकतात. या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम सरकारने सुचवलेला असतो. त्यामुळे आम्ही त्यात बदल करू शकत नाही.

सध्या लेखी परीक्षेनंतर अर्ध्या तासात उमेदवाराला निकाल कळतो. त्याचा त्याला काही आक्षेप असल्यास आठवडाभरात शंका निरसन होते. गुणवत्तेवर मुलाखतीची संधी दिली जाते. त्यात चांगली कामगिरी करणाऱ्यांच्या नियुक्तीची शिफारस सरकारला केली जाते.

संगणकावर आधारीत ६० गुणांची परीक्षा ६० मिनिटांत द्यावी लागते. बरोबर उत्तरासाठी एक गुण मिळतो, तर चुकीचे उत्तर दिले तर एक गुण वजा केला जातो.

या पद्धतीत अनेक उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत असे सध्या दिसते, असे गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा म्हणाले.

उमेदवारांचे परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी

अभ्यास गटाकडे काम सोपवले

प्रक्रिया अधिक सुटसुटीत करून जास्तीत जास्त उमेदवारांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करावी असे आयोगाला वाटते. यामुळे भरती प्रक्रियेत नेमके काय बदल केले पाहिजेत यावर आयोगाने अभ्यास सुरू केला आहे. आयोगाने आपल्या पातळीवर अभ्यास गटाकडे हे काम सोपवले आहे.

गुण पद्धतीत बदल शक्य:

अर्जाची पूर्व छाननी, छाननी, लेखी परीक्षा, मुलाखत हे टप्पे उमेदवाराला आयोगाची भरती प्रक्रिया पार करण्यासाठी ओलांडावे लागतात. प्रत्येक टप्प्यावर गुण देण्याची पद्धती आहे. त्यातही बदल करण्याचा विचार आहे.

गरज का भासली :

सर्वसाधारपणे एका जागेच्या भरतीसाठी पाचजणांना मुलाखतीसाठी बोलावण्‍यात येते. तेवढे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवारच मिळत नसल्यामुळे एका पदासाठी तीनच उमेदवारांची मुलाखत घेण्याची वेळ आयोगावर येते. त्यामुळेही प्रक्रियेचा फेरविचार करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: धक्कादायक! भरदुपारी 25 लाख पळवले, पोलिसांनी लपवली चोरीची घटना; सांताक्रूझ येथील घटनेमुळे नागरिक संतप्त

Goa ZP Election Date: गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत मोठी बातमी, तारीख ढकलली 7 दिवसांनी पुढे; काय कारण? Watch Video

IFFI 2025: इफ्फी परेडची रंगीत तालीम अन् वाहतुकीचा बट्ट्याबोळ! 3 तास वाहनचालकांची परवड; बांदोडकर मार्गाला पोलिस छावणीचे स्वरूप

Baina Theft: मध्यरात्री 7 दरोडेखोर घुसले, कुटुंबावर केला जीवघेणा हल्ला; कपाट फोडून रोकड-दागिने लंपास; वाचा घटनाक्रम..

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता, पैशांचे नियोजन करण्यासाठी उत्तम दिवस; 'या' राशीसाठी आजच दिवस फायद्याचा!

SCROLL FOR NEXT