Goa Public Service Commission Exam Training in June
Goa Public Service Commission Exam Training in June 
गोवा

गोवा लोकसेवा आयोग परीक्षा प्रशिक्षण जूनमध्ये

दैनिक गोमन्तक

पणजी : येत्या जूनपासून विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग आणि गोवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षांविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गोवा मुक्तीच्या हिरकमहोत्सवी वर्षात मुक्तिलढ्याचे साक्षीदार असलेल्या ठिकाणांचे संवर्धन केले जाईल, स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाखतींवर ध्वनीचित्रफिती तयार केल्या जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

परीक्षा होणार
पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या, दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रत्यक्षात घेण्यात येतील. त्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर यावे लागेल. इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची शैक्षणिक संस्थांना मोकळीक आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पालिकेतील रोजंदारी, कंत्राटी कामगार सेवेत कायम
राज्यातील विविध पालिकांत रोजंदारी, कंत्राटी पद्धतीने गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या कामगारांना येत्या वर्षात सेवेत कायम केले जाणार आहे. सरकारने तसे ठरवले आहे. त्यांच्या मागण्यविषयी कामगार संघटनांनी सरकारकडे चर्चा केली आहे. त्यानंतर हा निर्णय घेतला आहे. पालिका व पणजी महापालिका निवडणूक एकत्रित घेतली जाऊ शकते, त्याविषयीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT