आम आदमी पक्षाची पत्रकार परिषद  Dainik Gomantak
गोवा

Goa:रोजगार विषयावर आपचे मुख्यमंत्र्याना चर्चेचे जाहीर आव्हान

गोवा सरकारने 10 हजार नोकऱ्याचे जे मोठे आमिष दाखवले आहे, तो एक जुमला असल्याची टीका करुन दिल्ली सरकारने रोजगार विनीयम केंंद्र बंद करण्याची प्रक्रिया केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: आपने रोजगार या विषयावर गोव्याच्या मुख्यमंत्र्याना(CM) जाहिर आव्हान दिले आहे. गोव्यातील भारतीय जनता पक्षापेक्षा दिल्लीतील आम आदमी पक्षाने मोठ्या प्रमाणात नोकऱ्या दिल्या आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(Dr. Pramod Sawant) यांनी रोजगार या विषयावर आपच्या नेत्याशी खुल्या चर्चेला यावे.असे आव्हान आपचे गोवा राज्य संयोजक राहूल म्हांबरे यांनी आज दिले. पणजी(Panaji) येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत म्हांबरे यांनी खुले आव्हान केले आहे.

यापुर्वी आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) गोवा सरकारला वीज व शिक्षण या विषयावर खुल्या चर्चेचे आव्हान दिले होते. त्यातील वीज विषयावर दिल्लीचे वीजमंत्री सत्येंद्र जैन व गोव्याचे वीजमंत्री निलेश काब्राल यांच्यात पणजी येथे जाहिर चर्चा झाली होती.

गोवा सरकार हे दिल्ली सरकारची नक्कल करत आहे. गोव्यातील मंत्री व आमदारांची मालमत्ता वाढत असून, सामान्य लोकांना योजनांचा लाभ मिळत नाही. आपने गोव्यात प्रत्येक घराला रोजगार द्यावा. तसेच नोकरी देण्याची घोषणा केल्यानंतर भाजप हे भितीच्या छायेखाली आले आहे. असे अनेक आरोप यावेळी म्हांबरे यांनी गोवा सरकारवर केले.

कोरोनामुळे (covid-19)संकटात सापडलेल्या नागरिकांना गोवा सराकार जे ५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे त्या मध्ये ते त्यांना घरपोच द्यावेत. मुख्यमंत्र्यानी फक्त आश्‍वासने देतात. त्यांनी तसे न करता गॅस सिलींडरचेही (Gas cylinder)दर कमी करावेत. अशी मागणी रॉड्रिगीज यांनी यावेळी केली. तर भाजपच्या प्रवक्त्यांनी अभ्यास करून बोलावे अशी सूचना ॲड. तिळवे यांनी केली. गोवा सरकारने 10 हजार नोकऱ्याचे जे मोठे आमिष दाखवले आहे, तो एक जुमला असल्याची टीका करुन दिल्ली (Delhi)सरकारने रोजगार विनीयम केंंद्र बंद करण्याची प्रक्रिया केली आहे. रोजगार बझार पोर्टलद्वारे 10 लाख रोजगार दिल्याचा दावा ॲड. तिळवे यांनी यावेळी केला. यावेळी आपच्या प्रवक्त्या सिसील रॉड्रिगीज, उपाध्यक्ष ॲड. सुरेल तिळवे व कॅप्टन वेन्सी वेयिगस उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India T20 World Cup Squad: सूर्यकुमारसाठी हा 'वर्ल्डकप' शेवटचा? हरपलेल्या फॉर्ममुळे वाढले टेन्शन; गिलबाबतही प्रश्नचिन्ह

स्वातंत्र्यसैनिकांनी जो गोवा दिला, तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी! CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Live News: डिचोलीत जिल्हा पंचायत निवडणुक मतदानाला सुरुवात!

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

SCROLL FOR NEXT