युगा सांबारी व श्रुता पै यांच्या समवेत मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष,प्राचार्य व शिक्षक  Dainik Gomantak
गोवा

Goa: शास्त्रीय गायन स्पर्धेत युगा व श्रुता यांची अभिमानास्पद कामगिरी

मठग्रामस्थ हिंदू सभेतर्फे युगा व श्रुता यांचा गौरव करण्यात आला

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : बेंगळुरु (Bangalore)येथील गोपालन राष्ट्रीय स्कुलतर्फे(Gopalan National School) घेण्यात आलेल्या मठग्रामस्थ हिंदु सभा (Math Gramastha Hindu Sabha) संचालित दामोदर विज्ञान उच्चमाध्यमिक येथील १२ वीत शिकणाऱ्या युगाने अखिल भारत आंतरशालेय ऑनलाईन भारतीय शास्त्रीय गायन (International Indian classical singing) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवून अभिमानास्पद कामगिरी करून शाळेच्या प्रतिष्ठेत आणखीन मोठी भर टाकली.

तसेच माजी विद्यार्थी श्रुता संदेश पै यांना आयआयटी हैद्राबाद अकादमीक एक्सलन्स 2021 पुरस्कार देऊन गौरव केला. कलांगण संस्थेत गुरु रामराव नायक यांच्याकडुन युगा शास्त्रीय संगीताचे धडे घेते. अखिल भारतीय शास्त्रीय संगीत स्पर्धेत देशभरातील 1000 पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. यापैकी 634 स्पर्धकांची पहिल्या फेरीसाठी निवड होती त्यापैकी टॉप १० मध्ये युगाची निवड झाली.

श्रुता पै ही 2013 ते 2015 या कालावधीत श्री दामोदर विज्ञान उच्च माध्यमिकची विद्यार्थिनी होती.बायो टॅकनोलोजी मध्ये मास्टर्स पदवी अभ्यासक्रमात तिची सर्वो्त्तम कामगिरी झाली. 2019 मध्ये बीएमएस अभियांत्रिकी महाविद्यालातुन बी ई पदवी प्राप्त केल्यावर गेट-बीटी पात्रता परिक्षेत भारतात 75वा क्रमांक पटकावला. आयआयटी हैद्राबादमधुन तीने वैद्यकीय बायोटॅकनोलोजीमध्ये एम टेक पदवी प्राप्त केली आहे.

मठग्रामस्थ हिंदू सभेतर्फे यांचा गौरव करण्यात आला तसेच संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग उर्फ भाई नायक तसेच प्राचार्य राजीव देसाई व व्यवस्थापनातर्फे या दोघांचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT