Goa Professional League Football Dainik Gomantak
गोवा

Goa Professional League: कळंगुटसाठी प्रतेशचा विजयी गोल; कुठ्ठाळी व्हिलेजर्सवर निसटता विजय

पेनल्टीवर नोंदवला गोल, 1-0 गोलफरकाने मात

किशोर पेटकर

Goa Professional League Football: प्रतेश शिरोडकर याने नोंदविलेल्या निर्णायक पेनल्टी गोलच्या बळावर कळंगुट असोसिएशनने प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी कुठ्ठाळी व्हिलेजर्स क्लबला 1-0 असे निसटते हरविले.

सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. सामन्याच्या 87 व्या मिनिटास कर्णधार प्रतेशने नोंदविलेल्या पेनल्टी गोलमुळे कळंगुटने सलग दुसऱ्या लढतीत पूर्ण तीन गुण प्राप्त केले. अगोदरच्या लढतीत पणजी फुटबॉलर्सला नमविलेल्या संघाचे आता सहा गुण झाले आहेत.

स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या कुठ्ठाळी व्हिलेजर्सने पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांना झुंजविले. धेंपो क्लबविरुद्ध 1-2 असे निसटते पराभूत झालेल्या कुठ्ठाळीच्या संघाला मंगळवारी दुसऱ्यांदा हार पत्करावी लागली.

सामन्यातील तीन मिनिटे बाकी असताना कुठ्ठाळी व्हिलेजर्सच्या ज्योलिस्टन रिबेलो याने पेनल्टी क्षेत्रात चेंडू हाताळण्याची चूक केली. त्यानंतर पेनल्टी फटक्यावर प्रतेश याने अचूक नेम साधला. कुठ्ठाळीचा क्लाईव्ह मिरांडा सामन्याचा मानकरी ठरला.

स्पर्धेत बुधवारी (ता. 6) सेझा फुटबॉल अकादमी आणि गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब यांच्यात धुळेर स्टेडियमवर सामना होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT