Private Buses Goa Dainik Gomanatk
गोवा

Goa Private Bus Owners: खासगी बस वाहतूकदारांसमोर अस्तित्वाचा प्रश्न, सरकारच्या वाहतूक धोरणावर बस मालक संघटनेची तीव्र नाराजी

Goa Government Transport Policy 2025: गोव्याचे परिवहन क्षेत्र सध्या मोठ्या अस्वस्थतेत सापडले आहे. अखिल गोवा खासगी बस मालक संघटनेने सरकारचे वाहतूक धोरण आणि प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Manish Jadhav

पणजी: गोव्याचे परिवहन क्षेत्र सध्या मोठ्या अस्वस्थतेत सापडले आहे. अखिल गोवा खासगी बस मालक संघटनेने सरकारचे वाहतूक धोरण आणि प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी यासंदर्भात वाहतूक खात्याला निवेदन सादर केले आहे. निवेदनात या धोरणांमुळे खासगी बस वाहतूकदारांवर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ताम्हणकर यांनी मोपातील ब्लू कॅब टॅक्सी असोसिएशनचे काउंटर सरकारने (Government) ताब्यात घेऊन स्थानिकांना द्यावे अशी मागणी केेली आहे.

वाहतूक अ‍ॅग्रीगेटरला विरोध

संघटनेने सरकारच्या ‘माझी बस योजना 2025’ व ‘गोवा ट्रान्स्पोर्ट अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे 2025’ या प्रस्तावित धोरणांवर कडाडून आक्षेप घेतले आहेत. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2020 पूर्वी गोव्यात1460 खासगी स्टेज कॅरेज बसेस कार्यरत होत्या, परंतु सध्या केवळ 1073 बस चालू आहेत, म्हणजेच 387 बस बंद अवस्थेत आहेत. याचे कारण म्हणून त्यांनी सरकार आणि परिवहन विभागाच्या कार्यक्षमतेअभावी झालेले दुर्लक्ष हे नमूद केले आहे.

पारंपरिक व्यवसाय टिकावा

''गोवा ट्रान्स्पोर्ट अ‍ॅग्रीगेटर गाईडलाइन्स 2025’ या प्रस्तावित धोरणांबाबत संघटनेने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. यात टॅक्सी चालक, क्लीनर, वाहतूक कर्मचारी यांचे हित धोक्यात येईल, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे. सरकारकडून धोरणे आखताना स्थानिक रोजगार (Employment), खासगी क्षेत्रातील चालकांचे हित, आणि पारंपरिक व्यवसाय टिकवण्यावर भर दिला गेला पाहिजे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT