Pratima Coutinho Dainik Gomantak
गोवा

सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्थसहाय्य त्वरित द्या : कुतिन्हो

हे सरकार शपथविधी सोहळावर कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र मूलभूत गरजांसाठीचे पैसे देण्यास टाळाटाळ करते : कुतिन्हो

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, लाडली लक्ष्मी योजना, गृह आधार यांसारख्या योजनांचे पैसे गेल्या अनेक दिवसांपासून अजून येणे बाकी आहेत. हे पैसे आठवड्याभरात द्यावेत, अन्यथा आंदोलनाचा इशारा आम आदमी पक्षाच्या महिला विभागाच्यावतीने ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी दिला आहे. यावेळी रोशनी गावस आणि अफरीन शेख उपस्थिती होत्या.

कुतिन्हो पुढे म्हणाल्या राज्य सरकार अंत्योदय तत्त्वानुसार चालत असल्याचे सांगते, प्रत्यक्षात मात्र सामान्यातल्या सामान्य ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि विधवा यांच्यासाठीच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे पैसे चार महिन्यांपासून दिलेले नाहीत. राज्यातील 1 लाख 37 हजार लोकांना या योजनेचा फायदा होतो. यापैकी 12 हजार लोक हे विशेष लोक आहे आणि यात मोठ्या प्रमाणात विधवा भगिनी आहेत. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी योजनांचे पैसे तातडीने देऊ असे जाहीर केले होते. मात्र, केवळ एका महिन्याचे पैसे दिले असून, अन्य चार महिन्याचे पैसे प्रलंबित ठेवले आहेत. हे सरकार शपथविधी सोहळावर कोट्यवधी रुपये खर्च करते आणि सामान्य माणसाच्या मूलभूत गरजांसाठीचे पैसे देण्यास टाळाटाळ करते.

महिला आणि बाल कल्याण खात्याकडे कोविड काळात लाडली लक्ष्मी योजनेसाठी एकूण 1,04,218 अर्ज आले आहेत. त्यापैकी 74,186 मंजूर झाले आहेत आणि 19471 सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय गृह आधार योजना मिळवण्याकरिता 1,91,838 अर्ज आले आहेत. त्यापैकी 1,65,724 मंजूर झाले आहेत आणि 12,658 अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय, लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत 2018 पासूनची थकबाकी आहे. आज लाडली लक्ष्मी योजनेच्या काही लाभार्थ्यांची लग्ने झाली आहेत आणि त्यांना आता एक मूलही आहे, परंतु ते अजूनही पैशाची वाट पाहत आहेत, असे कुतिन्हो म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT