Goa News| CM Pramod Sawant
Goa News| CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: क्षणात सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 'खरी कुजबुज'

दैनिक गोमन्तक

मिरामार किनाऱ्यावरील क्लिनेथॉन रॅलीमध्ये व्यासपीठावरील मान्यवरांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तथा गायिका अमृता फडणवीस अग्रस्थानी होत्या.

त्यांची ओळख करुन दिल्यानंतर सूत्रसंचालकांनी डॉ. प्रमोद सावंत यांची ओळख चुकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अशी करुन दिल्यावर एकच हशा पिकला.

आपल्या भाषणात सावंत यांनी प्रथम या चुकीच्या वाक्याचा समाचार घेत मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केले तर ते गोमंतकीयांना आवडणार नाही, असे सांगितल्यावर पुन्हा हास्यकल्लोळ झाला.

बिझी सीएम सावंत

आज दिवसभराचे हेक्‍टिक शेड्युल पूर्ण करून मुख्यमंत्री रात्री उशिरा गुजरात विधानसभेच्या प्रचारासाठी रवाना झाले. मुख्यमंत्री दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारासाठी केले असता राज्यात राज्यपालांच्या ग्राम संपूर्ण यात्रेचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावर विरोधकांनी जोरदार टीका केले होती. आता मुख्यमंत्री गुजरातमध्ये प्रचारासाठी गेले असताना विरोधकांची भूमिका काय असेल? हे पहाणे उत्सुकतेच राहणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सुभाषभाऊ आक्रमक

सांगेचे सुभाषभाऊ हे आयआयटी प्रकरणात भलतेच आक्रमक बनले आहेत. जमीन कमी पडत असेल तर ती मिळवून देऊ, पण कोणत्याही स्थितीत ही प्रतिष्ठेची राष्ट्रीय संस्था बाहेर जाऊ देणार नाही, असा चंग त्यांनी बांधला आहे.

त्यांच्या दाव्याप्रमाणे- मुख्यमंत्र्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. या प्रकल्पासाठी सुपीक जमीन जाते, असा गळा काढणारी मंडळी काणकोणमधील भगवती पठारावरील जमीन खडकाळ व नापीक असतानाही विरोध करत होती.

त्यातून विरोधामागील राजकारण उघड होते, हा त्यांचा मुद्दा मात्र पटणारा आहे. पण आयआयटीला इतकी जागा पाहिजेच कशाला? यावर कोणी विचार करेल का?

इफ्फीपासून राजकारणी दूर

दहा दिवस चाललेल्या इफ्फीचा समारोप झाला. एक खरे की पूर्वीप्रमाणे सर्वसामान्यांना आता या महोत्सवाचे आकर्षण राहिलेले नाही. पणजीमधील रहिवाशांना तर इफ्फी म्हणजे वाहतुक कोंडीची समस्या बनू लागलेली आहे.

पण येथे तो मुद्दा नाही, तर सर्वसामान्यांप्रमाणे राजकारणी मंडळींनाही या महोत्सवाचे आकर्षण नसते. नाही म्हणायला आपले समर्थक व कार्यकर्ते यांना ते पासेस तसेच छोटी मोठी कामे अवश्य मिळवून देतात, पण कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होताना दिसत नाही.

इफ्फीच्या सुरुवातीच्या काळात मंत्री वा आमदार उपस्थित राहिले, तर ती बातमी होत होती, पण नंतर नंतर कोणी दखल घेईनासा झाले. हेच तर त्यांच्या पाठ फिरविण्याचे कारण नसेल ना?

आता इफ्फीचे कवित्व सुरू

53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट फेस्टिवलचा आज समारोप झाला. या फेस्टिवलमध्ये झालेल्या अनेक चुकांवर आता विरोधकांनी बोट ठेवत सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

विविध कार्यक्रमांपासून आयोजनावर केलेला करोडो रुपयांचा खर्च कसा चुकीचा आहे ? हे दाखवण्यासाठी विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यातच यंदाचा खर्चही 60 कोटी इतका अवाढव्य झाल्याने विरोधकांना टीका करण्याची आयती संधी चालून आली आहे.

पुतळ्याची देखभाल करा!

भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मांद्रेतील पुतळ्याची देखभाल करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याची खंत अलीकडेच श्रीधर मांजरेकर यांनी व्यक्त केली. तसे पाहिल्यास आमदार जित आरोलकर यांचा पेशा, व्यवसाय व त्यांची उदरगत संस्था तशी कमी नसल्याचे दिसून येते.

मात्र मांजरेकर यांनी जाहीरपणे सांगण्याचा हेतू काय होता? याची चर्चा चालू आहे. मगोचे आमदार असूनही बांदोडकर यांचा अर्धपुतळा उपेक्षित राहणे योग्य नाही.

उलट भाऊसाहेब बांदोडकर यांचा वारसा जपला, अशी सांगणारी मंडळी, मांद्रेत संस्था चालवतात, परंतु बांदोडकर यांचा पुतळा व उद्यानाची निगा का राखू शकत नाही? हा मुद्दा आहे. संबंधितांनी पुतळ्याची नियमित देखभाल करायला हवी, अशी माद्रेत चर्चा आहे.

चित्रपटाचा प्रपोगंडा

इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागात कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. प्रादेशिक ''फ्लेव्हर'' म्हणून ही निवड योग्य असेलही. अर्थात हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आणि युनोस्को गांधी मेडलसाठीही घुसवण्यात आला होता.

याबाबत दस्तुरखुद आंतरराष्ट्रीय ज्युरीने एनएफडीसीची कान उघडणी केल्याचे समजते. कारण युनेस्को गांधी मेडल हे गांधीजींच्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी आणि सकारात्मक विचारधारेसाठी दिले जातो.

या चित्रपटातून कोणता सकारात्मक विचार दिला गेला, असे एका ज्युरीनी विचारले म्हणे. त्यावर आयोजकानी तोंडावर बोट ठेवले आहे म्हणे.

ऑनलाइन जुगाराचा धमाका!

जुगारामुळे महाभारत घडले, जुगाराने अनेकजण देशो धडीला लागले, मात्र आपण आम जनता व मायबाप सरकार यातून काही बोध घेत आहे, असे दिसत नाही. आपल्या देशात व राज्यात जुगार खेळणे गुन्हा आहे.

तरी असताना सरकारच्या आशीर्वादाने कसिनो व पोलिसांच्या आशीर्वादाने मटका, जुगार खुले आम चालू आहे. जुगाराला बंदी असतानाही ऑनलाइन जुगार मात्र ‘खुल्लम खुल्ला’ सुरू आहे. आपले क्रिकेट आयकॉन व फिल्मी सितारे आम जनतेला जुगार खेळण्यासाठी प्रोत्साहित करतात.

ऑनलाइन जुगाराची टीव्ही चॅनेल्सवर जाहिरातही होते. जर देशात जुगार बंदी आहे, तर हा ऑनलाइन जुगाराचा खेळ कुणाच्या आशीर्वादाने चालतो? हाच खरा प्रश्न आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT