youth congress committee protested at Azad Maidan  Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City : ‘स्मार्ट सिटी’च्या कामांबाबत युवक काँग्रेस आक्रमक; पणजीत निदर्शने

पणजी शहरात धोकादायक कामे

दैनिक गोमन्तक डिजिटल

राजधानीत स्मार्ट सिटीची सुरू असलेली अनियोजितरित्या आणि धोकादायक कामांवर गोवा प्रदेश युवक काँग्रेसने शुक्रवारी आझाद मैदानावर निदर्शने केली.

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्राद म्हणाले, स्मार्ट सिटीच्या काम हे पणजीकरांची डोकेदुखी बनली आहे. स्थानिक नागरिकांना विश्वासत न घेता, त्यांच्या समस्या न जाणून घेता ही कामे सुरू आहेत.

इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडची (आयपीएससीडीएल) संकेतस्थळावर कोणती कामे सुरू आहेत, कोठे सुरू आहेत याची माहिती दिली जात नाही. आयपीएससीडीएलच्या संकेतस्थळावर अजिबात माहिती अपलोड केली जात नाही.

स्मार्ट सिटी मंडळाचे सदस्य असलेले महापौर या विषयावर पणजीवासीयांशी बोलण्यास का टाळाटाळ करतात. येथील नागरिकांना विश्वासात घेण्यास त्यांना अपयश आले आहे. वाहतूक पोलिसांनी जे आक्षेप नोंदविले होते, तेही स्मार्ट सिटी वाल्यांनी विचारात घेतलेले नाहीत, त्यामुळे वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रिनाल्डो रोझोरियो यांनी स्मार्ट सिटीचे काम म्हणजे सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा आहे. विकासाच्या नावाखाली लूट चालवली आहे. नियोजनशून्य सुरू असलेल्याया कामांबद्दल निषेध व्यक्त करतो.

दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष महेश नाडर म्हणाले, शहरातील रस्ते खोदून ठेवण्याचे प्रकार अपघातांस कारणीभूत ठरले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेची चिंता सरकारला अजिबात नाही, नागरिकांसाठी नव्हे तर ‘जी-20‘ बैठकीसाठी पणजीचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू असल्याची टीका त्यांनी केली. याप्रसंगी इतर उपस्थितांनीही आपली मते व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT