Xeldem and Cuncolim ehv substation maintenance  Dainik Gomantak
गोवा

Power Shutdown: देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे गोव्यात होणार वीजपुरवठा खंडित, काय आहे वेळापत्रक? कोणत्या भागांना बसणार फटका? जाणून घ्या

Electricity shutdown notice June 2025: आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत वीजवाहिन्यांच्या देखरेखीसाठी 1 जून 2025 रोजी सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्याची माहिती वीज खात्याने दिली आहे.

Manish Jadhav

शेल्डे आणि कुंक्कळी येथील ईएचव्ही (एक्स्ट्रा हाय व्होल्टेज) उपकेंद्रांची नियमित देखभाल तसेच 220 केव्ही क्षमतेच्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत वीजवाहिन्यांच्या देखरेखीसाठी 1 जून 2025 रोजी सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा वीज खात्याने केली आहे.

वार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम

दरम्यान, ही बंदी नियोजित असून वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आवश्यक असल्याचे वीज खात्याकडून सांगण्यात आले. मात्र वीज खात्याच्या या निर्णयाचा परिणाम काणकोण, सासष्टी, सांगे, केपे आणि धारबांदोडा (Dharbandora) तालुक्यांतील काही भागांवर होणार आहे. विशेषतः किर्लपाल-दाबाळ, शिगाव कुळे, मोले तसेच फोंडा तालुक्यातील व्ही.पी. पंचवाडी या भागांमध्ये पूर्णतः वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन

वीज खात्याने नागरिकांना आणि औद्योगिक वापरकर्त्यांना आवश्यक त्या तयारीची सूचना केली असून काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीतरित्या पूर्ववत केला जाईल, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. यासोबत वीज खात्याने नागरिकांना (Citizens) या कालावधीत विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले असून, कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी वेळेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

SCROLL FOR NEXT