सासष्टी: तक्रार दिल्यास २४ तासांत राज्यातील रस्त्यांवर पडलेले तातडीने खड्डे बुजवू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी दिले.
आके मडगाव येथील प्रभाग २१ मधील नागरिकांतर्फे आयोजित सत्कार प्रसंगी मंत्री दिगंबर कामत बोलत होते. सुलभता हे माझे वैशिष्ट्य आहे, म्हणूनच तर मी इतकी वर्षे राजकारणात पाय घट्ट रोवून उभा आहे. मडगावचे आमदार म्हणून ३० वर्षे सेवा करीत आहे.
मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हाही माझे दरवाजे मडगावकरांसाठी उघडे होतेच, आजही आहेत व भविष्यातही राहणार आहेत, काणकोण, पेडणे, धारबांदोडा या भागातील लोकही आपल्याला सहजतेने भेटू शकत. मी कॉंग्रेसमध्ये असो, वा भाजपमध्ये आपल्या या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावामुळेच लोक माझ्याकडे आकर्षित होतात.
जेव्हा आपण मुख्यमंत्री होतो, तेव्हा देशात लोकांसाठी सहज सुलभ असलेला मुख्यमंत्री कोण याचे सर्वेक्षण झाले होते. त्यात आपल्याला पहिला क्रमांक देण्यात आला होता.रस्त्यावरील खड्डे केवळ २४ तासांत बुजविण्याचे आदेश आपण अधिकाऱ्यांना दिले आहेत. वर्तमान पत्रावर किंवा समाज माध्यमात असे फोटो आलेत, की आपल्या आदेशाची वाट न पाहता रस्ते दुरुस्ती केलेली आपल्याला हवी आहे, असे आदेश आपण अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी अविनाश शिरोडकर, डॉ. राजेश्वर नायक, रंजन नाईक, अनुपमा सुरज पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दीपा शिरोडकर यांनी आभार मानले. नवनाथ खांडेपारकर यांनी सूत्रसंचालन केले.
बांधकाम खाते लोकाभिमुख करणार!
सध्या आपल्याकडे बांधकाम खात्याचा पदभार आहे. या खात्याला लोकाभिमुख करण्याचा आपला प्रयत्न असेल. आपण गोव्यातील हॉटमिक्स प्लांटची पाहणी करणार आहे. व कुठला प्लांट चांगले काम करतो, याची तपासणी करणार आहे, असे मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. एरव्ही हॉटमिक्स प्लांट पाऊस थांबल्यावर सुरू केले जातात. पण या प्लांटच्या मालकांनी ते ३० सप्टेंबर पर्यंत सुरू करण्याचे आश्वासन आपल्याला दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.