Porvorim Hit & Run Case Dainik Gomantak
गोवा

Porvorim Hit & Run Case: पर्वरी 'हिट अँड रन' प्रकरणी रशियन नागरिकाला अटक

Porvorim Hit & Run Case: या अपघातात दुचाकी चालक हर्षल म्हापणकर रस्त्यावर पडून गंभीररीत्या जखमी झाला होता.

Ganeshprasad Gogate

Porvorim Hit & Run Case: 07 डिसेंबर रोजी पर्वरी आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम जवळ ह्युंदाई कार आणि अॅक्टिव्हा स्कूटर यांच्या झालेल्या अपघाताप्रकरणी एक अपडेट हाती येतेय. या अपघातातील रशियन कार चालक दिमित्री कुतिन सायओ. (वय 20 वर्षे) याला पोलिसांनी अटक केलीय.

हा अपघात घडल्यावर कार चालकाने जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात न नेता घटनास्थळावरून पलायन केले होते. पोलिसांनी बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने वाहन चालवल्या प्रकरणी IPC आणि MV कायद्याचे कलम- 134(A)(B) द्वारे गुन्हा नोंदवला असून सदर रशियन कार चालकाला अटक केलीय.

या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय मार्गावरून म्हापसा येथे जाणाऱ्या रशियन कार चालक दिमित्री कुतिन सायओ याची अॅक्टिव्हा स्कूटर चालक हर्षल म्हापणकर याला जोरदार धडक बसली होती.

हा अपघात पर्वरी आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमजवळ घडला होता. या धडकेने दुचाकी चालक हर्षल म्हापणकर रस्त्यावर पडून गंभीररीत्या जखमी झाला होता.

तसेच त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. घटना घडताच कार चालकाने दुचाकीस्वाराला रुग्णालयात न नेता घटनास्थळावरून पळ काढला. अखेर आज 15 डिसेंबर रोजी त्याला कोरगाव- पेडणे येथे ताब्यात घेऊन अटक करण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

Gold Price: बाजारात महागाईचा तडाखा! सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; पहिल्यांदाच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 30 हजाराच्या पार

'खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची सुरू, 15 दिवसांत काणे पूर्ण होणार'; आपच्या निवेदनानंतर CM सावंतांची माहिती

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

SCROLL FOR NEXT