Cricket  Dainik Gomantak
गोवा

Porvorim Accidental Death: पर्वरी येथे क्रिकेट खेळताना युवकाचा दुर्दैवी मृत्यू , कारण अस्पष्ट

दहा वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते

Ganeshprasad Gogate

Porvorim Accidental Death पर्वरी येथील फुटसाल अरेना येथे मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना अचानक खाली कोसळल्याने 27 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. राज रवींद्रनाथ नार्वेकर (रा. धुळेर, म्हापसा) असे या मृत युवकाचे नाव आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पुंडलिकनगर, येथील फुटसाल अरेना मैदानावर शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास राज क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. तेथे राजला अस्वस्थ वाटू लागल्याने तो मैदानाबाहेर आला. मित्रांनी त्याला पाणी पिण्यास दिले.

थोड्या वेळाने तो तिथेच बेशुद्धावस्थेत पडला. त्याला तातडीने जवळील खासगी इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासले आणि गोमेकॉत नेण्याचा सल्ला दिला. गोमेकॉत दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

पर्वरी पोलिस अधिक तपास करत आहेत. राज नार्वेकर याने अभियांत्रिकी शिक्षण घेतले होते. तो येथील एका खासगी कंपनीत नुकताच नोकरीला लागला होता. त्याचे कुटुंब आल्तिनो-पणजी येथे वास्तव्यास होते. दहा वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT