Ponda Road Accident Dainik Gomantak
गोवा

Ponda Road Accident: ढवळी-बायपास रोडवर अपघात; भरधाव कारची दुभाजकाला धडक, घटनास्थळी गर्दी

घटनेत कारचालक किरकोळ जखमी

Ganeshprasad Gogate

Ponda Road Accident गोव्यात सध्या रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून नुकतीच फोंडा ढवळी-बायपास रोडवर एका कारला अपघात झाल्याची घटना समोर येतेय. ढवळी-बायपास रोडवरून जाणारी एक कार दुभाजकाला धडकून उलटली असून या घटनेत कारचालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येतेय.

सदर कार भरधाव वेगाने जात असून चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदरचा अपघात घडल्याचे सांगितले जातेय. घटनास्थळी स्थानिकांची गर्दी झाली असून उपस्थितांनी चालक चालकाला कार मधून बाहेर काढल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

दरम्यान गोव्यात वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गोवा वाहतूक पोलीस प्रयत्न करीत आहेत.

विशेषतः द्रुतगती महामार्गांवर तसेच गर्दीच्या ठिकाणी CCTV Camera तैनात असून स्पीड लिमिट क्रॉस करणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई करून दंड देखील आकारात आहेत.

मात्र असे असूनही बेदरकारपणे वाहन चालवण्याची वृत्ती कमी हो नसल्याचे या होणाऱ्या अपघातांवरून वारंवार दिसून येतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: बुधाची राहुच्या नक्षत्रात एन्ट्री, 'या' 3 राशींच्या बँक बॅलेन्सची गाडी सुस्साट; व्यापारात भरभराट अन् नोकरीत प्रमोशनचा योग

Mardol: सफर गोव्याची! ओहोळ-नाल्यांचं संगीत ऐकणारं, फुलांचा सुगंध घेऊन येणारं 'म्हार्दोळ'

Sudan Attack: सुदान पुन्हा हादरलं! जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्यांवरच काळाचा घाला; गोळीबारात 8 मुलांसह 24 निष्पाप नागरिकांचा मृत्यू

"बाबर आझमकडे सिक्स मारण्याची क्षमताच नाही...", LIVE मॅचमध्ये मोहम्मद कैफनं काढली लायकी Watch Video

Bicholim Accident: विजयनगर–कारापूर येथे भरधाव कारची पादचारी महिलेला धडक

SCROLL FOR NEXT