Rohan khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Religious Tourism: गोव्यातील आध्यात्मिक पर्यटनाला वाव देणार- रोहन खंवटे

Goa Religious Tourism: गोवा राज्यात आध्यात्मिक पर्यटन संकल्पना अस्तित्वात आणण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Religious Tourism: गोव्यातील पर्यटन उद्योगाची प्रतिमा केवळ समुद्र किनाऱ्यांपुरती मर्यादित न ठेवता आणखी पर्याय शोधण्याची आवश्यकता आहे. याचाच भाग म्हणून राज्यात आध्यात्मिक पर्यटन संकल्पना अस्तित्वात आणण्यात येणार आहे.

येथील मंदिरे आणि चर्चेस जागतिक स्तरावर प्रसिद्ध केली जातील. यासाठी पुढील चार ते महिन्यांत साधनसुविधा निर्माण केल्या जातील, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. पर्वरीतील सचिवालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात इको टुरिझम सुरू असून यात आध्यात्मिक पर्यटनाचाही समावेश केला जाईल. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात देवदर्शन आणि पूजा ऑनलाईन केली जाते. या सुविधेचा लाभ पर्यटकांनाही दिला पाहिजे.

राज्यातील मंदिर समित्यांसोबत चर्चा करून त्यांना यात सहभागी करण्यासाठी बोलणी सुरू आहे. जुने गोवे वगळता इतर ठिकाणी असलेल्या चर्चेस देखील याचा भाग बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.

पर्यटकांसाठी सहलींचे आयोजन

फोंडा, तांबडी सुर्ल यासारख्या ठिकाणी पर्यटकांसाठी सहली सुरू केल्या जातील. तांबडी सुर्ल येथे आध्यात्मिक, शिवाय इको आणि वेलनेस पर्यटनदेखील आहे. या सगळ्यांचा समावेश करून एकत्र पॅकेज तयार केले जाईल. पर्यटकांसाठी सहली तयार करण्यावर काम सुरू आहे. राज्यात आठ ते दहा दिवसांसाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांचा मुक्काम आणखी वाढवण्यासाठी हे फायदेशीर ठरणार आहे. असे झाल्यास याचा फायदा अर्थव्यवस्थेला होईल, असे खंवटे म्हणाले.

होम स्टे मसुदा तयार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात अंत्योदय तत्त्वावर भर दिला आहे. आध्यात्मिक पर्यटनाद्वारे आम्ही ग्रामीण भागात पोहोचणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला याचा लाभ व्हावा, यासाठी सरकार आणि पर्यटन खात्याचे काम सुरू आहे. पर्यटन उद्योग आणखी सुलभ करण्यासाठी होम स्टे मसुदा तयार करण्यात आला आहे, असे खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT