Goa State Pollution Control Board Dainik Gomantak
गोवा

Goa Pollution Control Board: नव्या प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रक्रिया रखडली, पर्यावरण नियंत्रण यंत्रणेवर अनिश्चिततेचे सावट

Pollution Board Reconstitution Delay: मुदत संपल्यानंतर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ सरकारने अधिकृतपणे बरखास्त केले असले, तरी नव्याने मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रखडली आहे.

Manish Jadhav

पणजी: मुदत संपल्यानंतर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ सरकारने अधिकृतपणे बरखास्त केले असले, तरी नव्याने मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रखडली आहे. परिणामी, राज्यातील पर्यावरण नियंत्रण यंत्रणेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.

दरम्यान, सध्या या मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार पर्यावरण सचिव अरुण कुमार मिश्रा यांच्याकडे तर सदस्य सचिवपदाचा तात्पुरता कार्यभार मंडळाचे वरिष्ठ पर्यावरण अभियंता संजीव जोगळेकर यांच्याकडे आहे. मात्र, या दोन्ही पदांवर कायमस्वरुपी नियुक्त्यांसाठी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अध्यक्ष व सदस्य सचिवपदासाठी सरकारने अर्ज मागवले होते. सदस्य सचिवपदासाठी दोन वेळा जाहिरातही देण्यात आली, परंतु अपेक्षित पात्र उमेदवारांची निवड होऊ शकलेली नाही. शिवाय मंडळावर संचालक म्हणून नियुक्त होण्यासाठी किमान बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असलेले ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवक आवश्यक असतात. अशा पात्र व्यक्तींची माहिती पर्यावरण (Environment) खात्याने मुख्यमंत्री कार्यालयाला दिली आहे.

धोरणे, उपाययोजना रेंगाळत पडल्या

पर्यावरणमंत्री आलेक्‍स सिक्वेरा हे गेल्‍या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्‍यामुळे आपल्‍या कार्यालयात ते नियमितपणे उपस्थित राहू शकत नाहीत. परिणामी संबंधित फाईल पुढे न सरकता तशीच रखडली आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. राज्यात पर्यावरणाबाबतच्‍या समस्यांचे प्रमाण वाढत असताना, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कार्यक्षम सहभाग अत्यावश्यक आहे. मात्र, मंत्र्यांच्या अनुपस्थितीत ही संस्था केवळ कागदावरच असल्यासारखी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT